Manoj Jarange Patil : अन्यथा बीडमधील मराठा रस्त्यावर उतरेल; मनोज जरांगेंचा सरकारला आनखी एक अल्टिमेटम

Manoj Jarange Patil : बीडमधील अधिकारी आंदोलकांवर नाहक गुन्हे दाखल करतायत. हा प्रकार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी थांबवावा. अन्यथा बीडमधील मराठा रस्त्यावर उतरेल, असा इशारा मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला दिला आहे. 

मराठा आरक्षणासाठी गेल्या काही दिवसांत बीड आणि जालन्यात मोठी आंदोलने झाले. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेत त्याच्यावर गुन्हे दाखल केले होते. तसेच दोन दिवसांपूर्वी गावबंदीचे बॅनर फाडल्याने जालन्यातील भोकदरन येथे दोन गटांत वाद झाला होता. यावेळीही पोलीसांनी दोन्ही गटातील तरुणांवर कारवाई केली.

Somvati Amavasya Yatra 2023 : यळकोट यळकोट जय मल्हार..., सोमवती अमावस्येनिमित्त जेजुरी गड सजला; भाविकांची गर्दी

त्यावरून बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं की, "बीड जिल्ह्यात मराठा आंदोलकांवर अधिकाऱ्यांकडून नाहक कारवाई करण्यात येत आहे. अधिकारी आंदोलकांवर गुन्हे दाखल करतायत. हा प्रकार गंभीर असून बीडमधील अधिकाऱ्यांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी समज द्यावी.

तेथील अधिकारी हे जातीयवादी आहेत. मात्र मराठा आंदोलकांना त्रास देण्याचा प्रकार थांबवला नाही तर दोन दिवसांत बीडमधील मराठा रस्त्यावर उतरेल असा ईशारा मनोज जरांगे पाटलांनी दिलाय.

अलीकडच्या काही दिवसांत राज्य सरकारने मराठा समाजला कुणबी प्रमाणपत्र मिळण्यासाठी काम वाढवलं असून सरकारच्या या कामावर समाधानी असल्याचं देखील जरांगेंनी यावेळी सांगितलं.

बीड आणि जालन्यातील अनदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना आदेश दिले आहेत. त्यामुळे २४ तारखेपर्यंत काहीही बोलता येणार नाही. बीडमधील राजकिय नेत्यांची घरे,कार्यालये यांची तोडफोड मराठा आंदोलकांनी केली नसून त्यांच्याच राजकीय वादातून ही जाळपोळ झाली त्यामुळे मराठा समाज नाहक असे गुन्हे दाखल झालेले खपवून घेणार नाही, असंही जरांगेंनी यावेळी ठामपणे सांगितलं आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply