Manoj Jarange Patil : १५ नोव्हेंबरपासून पुन्हा महाराष्ट्र दौरा, शांततेच्या मार्गाने आंदोलन... जरांगे पाटलांची पुढची रणनिती ठरली!

Manoj Jarange Patil : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या चांगलाच तापला आहे. मराठा आरक्षणासाठी लक्षवेधी लढा उभारलेले मनोज जरांगे पाटील सध्या छत्रपती संभाजीनगरमधील रुग्णालयात उपचार घेत आहेत. आज त्यांना रूग्णालयातून डिस्चार्च मिळणार आहे.

त्याआधी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी यंदा दिवाळी साजरी करणार नसल्याचे सांगितले आहे. मराठा आरक्षणासाठी अनेकांनी आत्महत्या केल्यात त्यामुळे दिवाळीचा सण साजरा करणार नसल्याचे जरांगे पाटील म्हणालेत.

htMathura Fire : मथुरेतील फटाक्यांच्या बाजाराला भीषण आग, 12 जण होरपळले, २६ दुकाने जळून खाक

काय म्हणाले जरांगे पाटील?

"आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार आहे. मराठा आरक्षणासाठी  अनेक बांधवांनी आत्महत्या केल्यात. त्यांच्या कुटुंबियांची रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर भेट घेणार असल्याचे जरांगे पाटील यांनी सांगितले. तसेच दोन दिवस आराम करुन १५ नोव्हेंबरपासून पुन्हा महाराष्ट्र दौरा सुरू करणार असल्याचे जरांगे पाटील यांनी सांगितले.

"मराठा आरक्षणासाठी अनेक बांधवांनी आत्महत्या केल्यात. त्यांचे दुःख मोठे आहे. सर्वत्र दुःखाचे सावट आहे, अशात सण कसा साजरा करु? असे म्हणत यंदा दिवाळी साजरी करणार नसल्याचेही मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply