Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंची 'शांतता रॅली' आज जालन्यात! होम ग्राऊंडवर होणार जल्लोषात स्वागत; शहरात तगडा पोलीस बंदोबस्त

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली आज जालन्यामध्ये निघणार आहे. या शांतता रॅलीच्या मार्गावर विविध समाज बांधवांकडून मनोज जारंगे पाटील यांचा भव्य सत्कार करण्यात येणार आहे. या रॅलीची मराठा बांधवांकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे.

आज मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात जालन्यात शांतता रॅली निघणार आहे. या शांतता रॅलीच्या मार्गावर विविध समाज बांधवांकडून मनोज जारंगे पाटील यांचा भव्य सत्कार करण्यात येणार आहे. शहरातील छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यापासून रॅलीला सुरुवात होणार असून याच ठिकाणी जय भीम सेनेच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांचे जंगी स्वागत होणार आहे..

Rain Update : मुंबई, उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस; ठाणे, नागपुरात सरीवर सरी, हवामान खात्याचा अंदाज काय?

काल बीडनंतर अंतरवाली सराटी येथे मुक्कामी असलेले मनोज जरांगे हे अकरा वाजता जालना शहरांमध्ये दाखल होतील. त्यानंतर जालना शहरातील छत्रपती संभाजी महाराज पुतळा चौकातून या रॅलीला सुरुवात होणार आहे. यासाठी आयोजकांकडून तयारी करण्यात आली असून रॅली दरम्यान तीन ठिकाणी मनोज जरांगे यांचे जेसीबी आणि मोठ्या फुलांचे हार घालून त्यांचं स्वागत होणार आहे.

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या रॅलीच्या पार्श्वभूमीवर जालन्यामध्ये तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शांतता रॅलीसाठी 400 पोलीस तैनात करण्यात आले असून रॅली मार्गावर सीसीटीव्हीद्वारे नजर ठेवली जाणार आहे. हजारो झेंडे आणि शेकडो बॅनर्समुळे शहर भगवामय झाले असून लाखोच्या संख्येने मराठा बांधव रॅलीमध्ये सहभागी होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply