Manoj Jarange Patil : मनोज जरांगे विधानसभेच्या आखाड्यात? 288 जागा लढवणार?

Manoj Jarange Patil : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी सगे-सोयऱ्याच्या कायद्यासाठी आक्रमक भूमिका घेत उपोषणास्त्र उगारलंय. मराठा आरक्षण दिलं नाही तर आता नाव घेऊन पाडणार असल्याचा थेट इशाराच मनोज जरांगे पाटलांनी दिलाय.

मनोज-जरांगे पाटलांनी लोकसभेच्या निवडणूकीदरम्यान मराठा समाजानं प्रत्येक मतदारसंघात 500 उमेदवार उभे करणार असल्याची घोषणा केली होती. मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना जागा दाखवून देण्याचं आवाहन केलं. त्याचा थेट फटका महायुतीला बसला. आता जरांगेंनी थेट विधानसभेच्या आखाड्यातच उतरण्याचा इशारा दिलाय.

Pune : भाजपने पुण्यात समुद्रही आणून दाखवला, राष्ट्रवादीच्या नेत्याचा सणसणीत टोला

मराठा आरक्षण न दिल्यास 288 जागांवर उमेदवार देण्याचं त्यांनी जाहीर केलंय. मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत की, मराठा आरक्षण नाही दिलं तर मग विधानसभेच्या 288 जागांवर सगळ्या जातीधर्माचे उमेदवार देणार.

मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा लोकसभा निवडणूकीत महायुतीला जोरदार फटका बसला. आता सगे सोयऱ्यांच्या अंमलबजावणीसाठी जरांगे पुन्हा मैदानात उतरले आहेत. त्यामुळे सरकारची पुन्हा एकदा कसोटी लागलीय.

जरांगेचा विश्वास मिळवण्यात सरकार अपयशी ठरलं तर महायुतीच्या आमदारांचं टेन्शन नक्कीच वाढू शकतं. त्यामुळे सरकार सगे-सोयऱ्यांची अंमलबजावणी करून मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन शमवणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply