Manoj Jarange Patil : अंतरवाली सराटीत मनोज जरांगेंचं जंगी स्वागत; मध्यरात्रीच मराठा समाजाचा जल्लोष,

Manoj Jarange Patil : राज्य सरकारने मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य केल्यानंतर शनिवारी (२७ जानेवारी) नवी मुंबईतून मराठा आंदोलक माघारी परतले. मनोज जरांगे पाटील देखील मध्यरात्रीच्या सुमारास जालन्यातील अंतरवाली सराटी गावात पोहचले. मुंबईतून मराठा आरक्षण घेऊनच परतल्यानंतर गावातील मराठा बांधवांनी जरांगेचं जंगी स्वागत केलं.

यावेळी डीजेवर मनोज जरांगे पाटील यांची मिरवणूक काढण्यात आली. तसेच गुलाल उधळून पेढे देखील वाटण्यात आले. मध्यरात्रीपर्यंत अंतरवाली सराटीत मराठ्यांचा जल्लोष सुरू होता. यावेळी एक मराठा लाख मराठा अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. 

Mumbai Lucknow Flight : मुंबई-लखनौ फ्लाईटमध्ये बॉम्बची अफवा, विमानात उडाला गोंधळ

दरम्यान, मनोज जरांगे पाटील रविवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास मराठा समाजाची बैठक घेणार आहेत. या बैठकीला तब्बल १२३ गावातील मराठा बांधव उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील या बैठकीत काय भूमिका मांडणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे.

आरक्षण मिळाले आता पुढे काय?

राज्य सरकारने मराठा समाजाच्या संपूर्ण मागण्या मान्य करत सुधारित अध्यादेश काढला. आता या अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर करण्यासाठी सरकारकडून फेब्रुवारी महिन्यात विशेष अधिवेशन घेण्यात येणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.

मराठा समाजास आरक्षण मिळाले आता पुढे काय? याबाबत निर्णय घेण्यासाठी मनोज जरांगे पाटील आजच्या बैठकीत आपली भूमिका स्पष्ट करणार आहे. दरम्यान, मराठ्यांचा सात बारा पक्का झाला, आता वळवळ करायची गरज नाही.आता सग्या सोयऱ्या शब्दाने सर्व मराठ्यांना आरक्षण मिळणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे सांगितले.

 


राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply