Manoj Jarange Patil : मराठा आंदोलनाला यश मिळाल्यानंतर मनोज जरांगेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, "आमची ताकद..."

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच्या ७ महिन्याच्या लढ्याला मोठं यश मिळालं आहे. राज्य सरकारने मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहे. रात्रीतूनच याबाबतचे अध्यादेश काढण्यात आले आहेत. मागण्या मान्य होताच नवी मुंबईत मराठा समाजाने जल्लोष सुरू केला आहे. 

आमच्या सर्व मागण्या मान्य केल्यानंतर मी राज्य सरकारचे आभार मानतो, असं मनोज जरांगे पाटील  यांनी म्हटलं आहे. "आमची विजयी सभा अंतरवाली सराटी येथील सभेपेक्षाही प्रचंड मोठी असेल. या सभेत आमचा सर्व मराठा समाज एकत्र जमणार आहे".

Navi Mumbai : सिडकोची उलवे, बामणडोंगरी येथील घरे ६ लाख रुपयांनी स्वस्त, मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर निर्णय

"आम्हाला फक्त ठिकाण बघायचं आहे. आम्ही  वाशी येथील शिवाजी चौकात जल्लोष करणार आणि त्यानंतर विजयी सभेची तारीख जाहीर करणार आहे, असं जरांगे यांनी म्हटलं आहे.

राज्य सरकारने जरांगेंच्या सर्व मागण्या मान्य करताच नवी मुंबईत मराठा आंदोलकांनी मध्यरात्रीच जल्लोष सुरू केला होता. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावं, तसेच आंदोलकांवरील गुन्हे तातडीने मागे घेण्यात यावेत, यासाठी मनोज जरांगे पाटील गेल्या ५ महिन्यांपासून आंदोलन करीत होते.

त्यांच्या आंदोलनाची सुरुवात जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथून झाली होती. सरकारला दिलेला २४ डिसेंबरचा अल्टिमेटम संपल्यानंतर जरांगे यांनी मुंबईत धडकण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार, शुक्रवारी (२६ जानेवारी) मराठ्यांचं वादळ नवी मुंबईत येऊन धडकलं होतं.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply