
Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पुन्हा एकदा रस्त्यावर उतरले आहेत. आपल्या मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी आजपासून जरांगेंचा राज्यव्यापी दौरा सुरू झाला आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटीमधील आंदोलना दरम्यान राज्य सरकाराच्या मुदतीस 14 ऑक्टोंबरला तीस दिवस पूर्ण होत आहेत. याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी शनिवारपासून महाराष्ट्रराज्यव्यापी दौऱ्याला सुरुवात केली आहे.
मनोज जरांगे यांनी आज अंतरवाली सराटी या गावातून सकाळी आठपासून या दौऱ्याला सुरुवात केलीये. आज अंबड शहरात एका कार्यक्रमास ते उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर घनसावंगी, कुंभार पिंपळगाव, परतूर, मंठा, या जालना जिल्ह्यातील गावानंतर ते मंठा-परतूर मार्गे ते जिंतूर, परभणी, हिंगोली असा त्यांचा दौरा करणार आहेत.
|
Accident News : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर कंटेनरची बसला धडक; कंडक्टरचा जागीच मृत्यू |
महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्यात 13 जिल्ह्यात दौरा पूर्ण झाल्यानंतर 14 ऑक्टोंबरला आंतरवाली सराटी गावात जाहीर सभा घेण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी राज्यव्यापी दौऱ्याला सुरुवात केली आहे.
तर दुसरीकडे आज मराठा आरक्षणासाठी राज्यातील अनेक महसूल मंडळातून कुणबी असल्याच्या नोंदी तपासल्या गेल्यात. त्यात एक कोटींहून अधिक दस्ताएवज तपासले गेलेत. यात फक्त पाच हजार नोंदी आढळून आल्या आहेत. जालना जिल्ह्यात सर्वाधिक दोन हजार नोंदी आढळल्या आहेत. बीड जिल्ह्यात 1740, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 299, लातूर 47, नांदेड 50, हिंगोली 18,धाराशिव जिल्ह्यात 365 तर परभणी जिल्ह्यात सर्वात कमी म्हणजे फक्त 5 नोंदी आढळल्या आहेत.
त्यामुळे मराठा आरक्षणासाठी तीस दिवसांची मुदत मागणाऱ्या राज्य सरकारच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यातच आरक्षणाची मागणी करणाऱ्या मनोज जरांगे यांच्यासमोर पेच निर्माण झाला आहे. मराठवाड्याचे आयुक्त देखील आज मुंबईत दाखल झाले असून दहा वाजता त्यांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होणार आहे.
या बैठकीदरम्यान सर्व जिल्हाधिकारी ऑनलाइन पद्धतीने या बैठकीला उपस्थित असणार आहेत. या सर्व नोंदी राज्य सरकारच्या समिती पुढे सादर करण्यात येणार आहेत. त्यातच मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा एल्गार पुकारला आहे. त्यासाठी त्यांनी राज्यव्यापी दौऱ्याला सुरुवात केली आहे. आज जालना,परभणी, हिंगोली या तीन जिल्ह्यापासून राज्य व्यापी दौऱ्याला सुरुवात करणार आहेत.
शहर
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
महाराष्ट्र
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना



























Subscribe to my channel

