Manoj Jarange Health Update: मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली; बसून बोलण्यासही होतोय त्रास

Manoj Jarange Health Update : जालन्यातील अंतरावाली सराटी गावात गेल्या १४ दिवसांपासून मराठा आंदोलक मनोज जरांगे उपोषणाला बसले आहेत. जरांगे यांनी आजपासून उपाचारांनाही नकार दिला आहे. जरांगे यांनी उपचाराला नकार देत आंदोलन आणखी तीव्र केलं आहे. जरांगे यांची प्रकृती खालावल्याने त्यांनी बसण्यासही त्रास होत आहे. 

मनोज जरांगे यांचे गेल्या १४ दिवसांपासून उपोषण सुरू आहे. कालपासून मनोज जरांगे यांनी अन्न आणि पाणी त्यागलं होतं. त्यानंतर आज डॉक्टरांच्या उपचारासही नकार दिला आहे. प्रकृती खालावल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी झोपलेल्या अवस्थेतच संवाद साधला.

यावेळी मनोज जरांगे म्हणाले, 'आरक्षण हाच माझ्यावर उपचार आहे. तपासण्या करायच्या तर आरक्षणाच्या करा. माझ्या तपासण्या म्हणजे फसवाफसवीच्या तपासण्या आहेत'.

Maharashtra Rain Alert : राज्यात येत्या ४८ तासांत पुन्हा मुसळधार; 'या' जिल्ह्यांना IMDचा इशारा

'मला फक्त आरक्षण हवं आहे. गेल्या ७५ वर्षांपासून मराठा समजाने मान सन्मान वाढवला. आता त्या समाजाचा सन्मान करण्याची जबाबदारी सरकारची आहे. ७५ वर्षांपासून मराठा लढतोय, मागण्या मागत असून सरकार इतकं दूधखुळं नाही. आज मराठ्यांना कळू द्या की, त्यांनी आमच्यावर काय परतफेड केली, असे ते म्हणाले.

'आमच्या मुलांनाही आरक्षण हवं. सरसगट आरक्षण सगळ्यांचं बसतं. मग आमचं आरक्षण कसं बसत नाही. व्यवसायानुसार इतरांना आरक्षण आहे, मग आम्हाला का नाही? आम्हाला सरकार मुर्ख समजत आहे. आम्ही डोक्यावर चालतो आणि ते पायावर चालतात का? आम्ही महाराष्ट्रातील नागरिक नाहीत का? त्यांना आरक्षण आहे, मग आम्हाला आरक्षण का नाही, असे ते पुढे म्हणाले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply