Manoj Jarange : पहाटे ४ वाजता कडाक्याच्या थंडीत मनोज जरांगेंनी घेतली सभा ; बोलताना म्हणाले 'तुमचे ऋण...'

Manoj Jarange : आज पहाटे चार वाजता करमाळा तालुक्यातील वांगी येथे मनोज जरांगे यांची सभा पार पडली आहे. काल (बुधवारी) संध्याकाळी ७ वाजता होणाऱ्या सभेला पोहोचण्यासाठी जरांगे यांना पहाटेचे चार वाजले. तरी देखील थंडीमध्ये कुडकुडत हजारोंच्या संख्येने मराठा बांधवांनी हजेरी लावली.

मनोज जरांगे यांच्या सभेसाठा काल दुपारपासून मराठा समाज हजारोंच्या संख्येने जमायला सुरूवात झाली होती. अनेक भागातून मराठा बांधव जमायला सुरूवात झाली होती. करमाळा येथील वांगी हे गाव उजनीच्या बॅक वॉटर वरती आहे. कडाक्याची थंडी या भागामध्ये जाणवते. इंदापुर येथील लोकही या सभेसाठी पोहोचले होते. सभेसाठी लाखाच्या आसपास लोक जमले होते. मात्र, जरांगे यांना पोहोचण्यासाठी उशीर झाला. ते पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास पोहोचले.

Nashik Malegaon News : ठाकरेंना मोठा धक्का; दादा भुसेंचे कट्टर विरोधक असलेल्या अद्वय हिरेंना अटक; प्रकरण नेमकं काय?

त्यांना पोहोचायला उशीर झाला मात्र, येथे जमलेल्यांनी मनोज जरांगे यांचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं. त्यानंतर ४ वाजता सभा पार पडली. ४ ते ५ मिनीटे ते सभेत बोलले. यावेळी बोलताना त्यांनी सांगितलं की, मराठा समाजाला आरक्षण मिळेल, तेव्हा ही करमाळ्याची सभा कायम लक्षात राहिलं. तुमचं जे प्रेम आहे, ऋण आहे ते हा मराठा समाज कधीही विसरणार नाही, असंही ते म्हणाले आहेत.

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply