Manoj Jarange : मनोज जरांगे पाटील पुढील आठवड्यात पुणे दौऱ्यावर, मराठा समाजाच्या कार्यालयाचे उद्घाटन करणार

Manoj Jarange : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील पुढील आठवड्यात पुणे दौऱ्यावर आहेत. ७ एप्रिल रोजी ते पुण्याला जाणार आहेत. पिंपरी आणि पुण्यातील विविध ठिकाणी मनोज जरांगे पाटील भेटी देणार  आहेत. बाणेर  येथे सकल मराठा समाजाच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या कार्यालयाचं उद्घाटन जरांगे यांच्या हस्ते होणार आहे. जरांगे पाटलांचा हा दौरा कसा असणार, ते आपण जाणून घेऊ या.

बाणेर येथे सकल मराठा समाजाच्या वतीने कार्यालय उभारण्यात येत आहे. त्याचं उद्घाटन मनोज जरांगे पाटील यांच्य हस्ते पार पडणार आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटलांनी आंदोलनं केली आहे. त्यासाठी त्यांनी उपोषण देखील केलं आहे. त्यामुळे सध्या मनोज जरांगे पाटील चांगलेच चर्चत आहेत. आता ते पुढील आठवड्यामध्ये पुणे दौऱ्यावर आहेत.

Kalyan Dombivali Municipal Corporation : केडीएमसीची 42 वर्षांत पहिल्यांदाच विक्रमी कर वसुली,622 कोटींचा टप्पा पार

मनोज जरांगे पाटील यांचा ७ तारखेला पुणे  दौरा कसा असणार, ते आपण जाणून घेऊ या. सकाळी ११ वाजता जरांगे पाटील निगडी सप्ताह येथे भेट देणार आहेत. त्यानंतर एक वाजता जरांगे पाटील निगडीहून देहूकडे प्रस्थान  करणार आहे. मनोज जरांगे ७ एप्रिलला २ वाजता देहू दर्शन करणार आहेत, त्यानंतर ते अडीच वाजता बाणेर- बालेवाडीकडे रवाना होणार आहेत.

जरांगे पाटील तीन वाजता बाणेरमध्ये सकल मराठा समाजाच्या कार्यालयाचे उद्घाटन करणार आहेत. दुपारी साडे तीन ते साडे चार या एक तासाच्या कालावधीत जेवण करून ते कोथरूडकडे रवाना होणार आहेत. सायंकाळी पाच वाजता कोथरूडमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करणार आहेत, त्यानंतर सायंकाळी ६ वाजता डेक्कनमध्ये ते छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार (Pune News) अर्पण करणार आहेत. सात वाजता जरांगे पाटील  लाल महालला भेट देणार आहेत. त्यानंतर रात्री ते पुण्यातच मुक्काम करणार असल्याची माहिती मिळत आहे.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply