Manoj Jarange : मनोज जरांगे पाटील आक्रमक; 'सागर' बंगल्यावर जायला निघाले; अंतरवाली सराटीत गोंधळ,

Manoj Jarange : राज्य सरकारने मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिले आहे. मात्र, दुसरीकडे मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण द्या, हा मुद्दा लावून धरला आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण आणि सगेसोयरे कायद्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. याचदरम्यान, मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करत सागर बंगल्यावर निघाल्याने अंतरवाली सराटीतील आंदोलनस्थळी एकच गोंधळ पाहायला मिळाला.

मनोज जरांगे पाटील यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. मागील गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांच्यावर सातत्याने आरोप करण्यात येत आहेत. यावरुन मनोज जरांगे पाटील आज जालन्यातील अंतरवाली सराटीतील आंदोलनस्थळावरून आक्रमक भूमिका घेतली. त्यानंतर अंतरवाली सराटीत मोठा गोंधळ निर्माण झाला आहे.

Wardha News : २ कोटी ६४ लाखांच्या अपहार; महिला भुसंपादन अधिकारीचा शासकीय रकमेवर डल्ला

 'मला संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मला मारण्याचा प्रयत्न होत आहे. मी देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर जातो, मला मारुन दाखवावं, असं आव्हान मनोज जरांगे यांनी केले आहे.

मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर जाणार असल्याची भूमिका स्पष्ट केल्यानंतर आंदोलनस्थळी एकच गोंधळ पाहायला मिळला. मनोज जरांगे यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर मराठा बांधवांनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र, जरांगे भूमिकेवर ठाम होते. त्यानंतर मनोज जरांगे हे देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर जाण्यासाठी पायी निघाले आहेत.

मनोज जरांगे यांच्यासोबत शेकडोच्या संख्येने मराठा बांधव आहेत. मुंबईच्या दिशेने निघालेल्या मनोज जरांगे यांना मराठा समर्थकांनी गराडा घातला आहे. याचदरम्यान, जरांगे हे गेल्या १६ दिवसांपासून उपोषणाला आहेत. त्यामुळे त्यांना पायी जाताना अचानक भोवळ आली. त्यानंतर थोड्यावेळासाठी रस्त्यावर बसले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply