Manoj Jarange : मुंबईत २० जानेवारीला ३ कोटी मराठा बांधव धडकणार; मनोज जरांगेंची माहिती

Manoj Jarange : मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारला दिलेला अल्टिमेटम संपल्यानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत येऊन आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. सध्या जरांगे हे आपल्या भूमिकेवर ठाम असून येत्या २० जानेवारीला ३ कोटी मराठा बांधव मुंबईत धडकणार आहे, अशी माहिती जरांगे यांनी दिली.

मुंबईत येणाऱ्या मराठा बांधवांची संख्या ३ कोटींपेक्षा कमी पडली बदलून ठेवा, असंही जरांगेंनी ठामपणे सांगितलं. मराठा समाजाची मुंबईच्या दिशेने कूच करण्याची वेळ आली असून त्यासाठी आम्ही तयारीला लागलो आहोत, असंही जरांगे म्हणाले.  

Mumbai News : अमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेल्या नायजेरियन तरुणाला अटक, ५५ लाखांचं कोकेन जप्त

१२ जानेवारी निमित्त मनोज जरांगे पाटील यांनी आज जालन्यातील अंतरवाली सराटी गावात राजमाता जिजाऊ माँ साहेब यांच्या प्रतिमेला अभिवादन केलं. यावेळी शेकडो मराठा बांधव तसेच भगिणींनी एकत्रित येऊन शिवआरती देखील केली. यावेळी जय जिजाऊ जय शिवराय अशा घोषणांनी परिसरत दणाणून गेला होता. 

दरम्यान, राजमाता जिजाऊ यांना अभिवादन केल्यानंतर जरांगे यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी जरांगे म्हणाले, राज्य सरकारकडून वारंवार सांगण्यात येतंय, की जरांगे पाटलांना तसेच मराठा समाजाला  मुंबईत येण्याची वेळ पडणार नाही. मात्र, आम्हाला वाटतं मुंबईला निघण्याची वेळ आली आहे.

आमचे मराठा बांधव उर्वरित कामे पूर्ण करत असून लवकरच आम्ही मुंबईच्या दिशेने कूच करू, असं जरांगे यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर येत्या २० जानेवारीला ३ कोटी मराठा बांधव मुंबईत धडकणार, ही संख्या कमी झाली तर नाव बदलून ठेवा, असंही जरांगेंनी ठामपणे सांगितलं आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply