Manohar Joshi : मनोहर जोशी यांची प्रकृती खालावली; हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरु

Manohar Joshi : माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची तब्येत खालावल्याने हिंदुजा रुग्णालयात उपचार घेत आहेत. दरम्यान, त्यांची विचारपूस करण्यासाठी उद्धव ठाकरे आणि त्यांची पत्नी रश्मी ठाकरे हिंदूजा रुग्णलयात दाखल झाले आहेत. 

कालपासून मनोहर जोशी यांना अस्वस्थ वाटत असल्याने हिंदुजा रुग्णलायात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी हे मुळचे बीडचे. त्यांचा जन्म 2 डिसेंबर 1937 मध्ये रायगड जिल्ह्यातील नांदवी या गावी एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. शिक्षणाच्या निमित्ताने मनोहर जोशी मुंबईत स्थलांतरित झाले. त M.A. L.L.B झाले होते. M.A. झाल्यानंतर त्यांना मुंबई महानगरपालिकेत अधिकाऱ्याची नोकरी मिळाली. 

शिवसेनेकडून विधानपरिषदेवर निवडून येऊन त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. 1976 ते 1977 या काळात ते मुंबईचे महापौर होते. राज्याच्या निवडणुकीत शिवसेना-भारतीय जनता पक्ष भाजप युतीने काँग्रेसचा पराभव केल्यावर ते महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री बनले. 1999 च्या सार्वत्रिक निवडणुकीत मुंबई सेंट्रलमधून विजयी झाल्यावर त्यांना लोकसभेत बढती मिळाली.

१९९९ ची गोष्ट तेव्हा मनोहर जोशी मुख्यमंत्री आणि गोपिनाथ मुंडे उपमुख्यमंत्री होते. १९९८ मध्ये मनोहर जोशी मुख्यमंत्री होते तेव्हा पुण्यात कर्वे रोडसारख्या प्राईम एरिआत त्यांचे जावई गिरीश व्यास यांना इमारत बांधायची होती. पण भूखंड शाळेसाठी आरक्षित होता. जेव्हा या इमारतीसंबंधीची फाईल जोशींसमोर आली तेव्हा मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे जामात गिरीश व्यास यांच्यासाठी पुण्यातील शाळेसाठी आरक्षण असलेल्या भूखंडाचं आरक्षण बदलल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. या मुद्यावरून राजकारण तापलेले होते.

त्यामूळे 'वर्षा' आणि 'मातोश्री' बंगल्यांमधला तणाव अगदी टोकाला गेला होता. त्यावेळी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी एक चिठ्ठी वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी धाडली.

मनोहर जोशी यांनी आधी तत्कालिन राज्यपाल पी. सी. अलेक्झांडर यांच्याकडे राजीनामा सुपूर्त करावा आणि मगच मला भेटायला यावे, असा निरोप शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पाठवला. हा निरोप मिळताच क्षणाचाही विलंब न करता जोशींनी राज्यपाल अलेक्झांडर यांच्याकडे राजीनामा दिला.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply