Manipur News : मणिपूरमध्ये आसाम रायफल्सच्या जवानाचा सहा सहकाऱ्यांवर गोळीबार, नंतर स्वत:वर गोळी झाडून केली आत्महत्या

Manipur News : मणिपूरमध्ये आसाम रायफल्सच्या (एआर) सैनिकाने बुधवारी त्याच्या साथीदारांवर गोळीबार केला. गोळीबारात सहा जवान जखमी झाले. या घटनेनंतर आरोपी जवानाने स्वतःवर गोळी झाडून जीवन संपवलं आहे.

सर्व जखमी जवानांना चुराचंदपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दक्षिण मणिपरमधील एआर बटालियन कॅम्पसमध्ये ही घटना घडली. या संपूर्ण घटनेचा मणिपूरमध्ये सुरू असलेल्या जातीय संघर्ष किंवा हिंसाचाराशी संबंध नाही, अशी माहिती देखील समोर येत आहे. 

Loksabha Election 2024 : महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा सुटणार? मुंबईत उद्या महत्त्वाची बैठक

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी गोळीबारासाठी वापरलेली रायफल जप्त केली आहे. आसाम रायफल्सच्या या जवानाने असं का केली याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र पोलीस याबाबत कुटुंबीयांशी बोलणार आहेत. आत्महत्या केलेल्या जवानाचा मोबाईल फोन देखील जप्त करण्यात आला आहे.

या हल्ल्यात जखमी झालेल्या जवानांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. या दुर्दैवी घटनेचा संबंध मणिपूरमध्ये सुरु असलेल्या संघर्षाशी जोडला जावू नये. कारण जखमींपैकी कोणीही मणिपूरचे नाही, असं पोलिसांनी म्हटलं आहे. घटनेची सखोल चौकशी केली जाणार असल्याचंही पोलिसांनी म्हटलं आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply