Mahesh Kothe Death : महाकुंभमेळ्यात शरद पवार गटाच्या नेत्यानं घेतला अखेरचा श्वास, महेश कोठे यांचं निधन

 

Mahesh Kothe Death :  सोलापूरचे माजी महापौर आणि शरद पवार गटाचे नेते महेश कोठे यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं आहे. वयाच्या ५५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. कुंभमेळ्याच्या निमित्ताने ते प्रयागराजला गेले होते. मात्र, ह्रदयविकाराचा धक्का आल्यानं त्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. महेश कोठे हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सोलापूरातील दिग्गज नेते होते. त्यांचा अकाली मृत्यू झाल्यानं हळहळ व्यक्त होत आहे.

महेश कोठे यांचे सोलापुरातील राजकारणात मोठे प्राबल्य होते. यंदाच्या सोलापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांचा पराभव झाला होता. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे अतिशय निकटवर्तीय म्हणून महेश कोठे यांची ओळख आहे. मृतदेह प्रयागराजवरून सोलापुरला आणल्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील.

Ulhasnagar Crime: चप्पलमध्ये गांजा लपवला, कैद्याला द्यायला कोर्टात गेला, पोलिसांना समजताच धूम ठोकली

महेश कोठे यांची ओळख सोलापूरचे सर्वात तरूण महापौर म्हणून ओळख होती. फक्त राजकारण नसून समाजकारणातही त्यांचे नाव आवर्जून घेतले जाते. सोलापूर महापालिकेचे महापौर, विरोधी पक्षनेते, सभागृह नेते अशा विविध जबाबदारी त्यांनी पार पाडली. काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी शरद पवार गट अशा पक्षात त्यांनी प्रवास करीत महत्त्वाची भूमिका बजावली.

महेश कोठे यांनी ४-५ वेळा निवडणूक लढवली. पण त्यांना पराभव स्वीकारावा लागला. मात्र महापालिकेच्या निवडणुतकात त्याचं वर्चस्व होतं. तब्बल १४ ते १५ नगरसेवक त्यांचे निवडून यायचे. महेश कोठे हे सोलापूर महापालिकेतील सर्वात तरूण महापौर होते. शिवसेनेला राम राम केल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. राष्ट्रवादीमध्ये जाण्यापूर्वी ते सोलापूर महापालिकेचे विरोधी पक्षनेते देखील होते. सध्या महेश कोठे यांचे नातू आमदार आहेत.

 

 

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply