Mahayuti Seat Sharing : महायुतीच्या जागावाटपाचा तिढा कायम, शिवसेना १६ जागांवर ठाम

Mahayuti Seat Sharing : महायुतीमध्ये भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्यात लोकसभेच्या जागावाटपाचा तिढा अद्याप पूर्णत: सुटलेला नाही. अशात महायुतीमध्ये मनसे देखील सहभागी होणार असल्याच्या चर्चा आहेत. शिवसेनेच्या कोट्यातूनच मनसेला जागा दिली जाण्याची शक्यता आहे. शिवसेनेने भाजपकडे १८ जागांची मागणी केली असून १६ जागांवर ठाम आहे.

शिवसेना कोट्यातूनच मनसेला जागा?

ठाणे, सिंधुदुर्ग, नाशिक, संभाजीनगरच्या जागेवरून भाजप आणि शिवसेनेमध्ये घासाघीस सुरु आहे. वाशिम, रामटेक, शिर्डी मतदारसंघात उमेदवारांची चाचपणी सुरु आहे. या मदतारसंघावर शिवसेनेकडून दावा केला जातोय. मात्र या जागांवरून भाजप आणि शिवसेनेत चर्चा सुरू आहेत. अशात शिवसेनेकडून १६ जागांचा आग्रह केला जातोय. यात जर मनसे देखील महायुतीत सहभागी झाल्यास महायुतीच्या शिवसेनेतूनच मनसेला जागा दिल्या जातील असं म्हटलं जातंय. त्यामुळे शिवसेनेच्या वाट्याला आणखी कमी जागा येण्याची शक्यता आहे.

Kolhapur Crime News : कोल्हापुरात युवकांच्या गटात राडा, दहा गाड्यांची ताेडफोड; पाेलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात

शिवसेना एकनाथ शिंदे गटातील माजी खासदार

1. श्रीकांत शिंदे - कल्याण

2. राहुल शेवाळे - दक्षिण मध्य मुंबई

3. हेमंत पाटील - हिंगोली

4. श्रीरंग बारणे - मावळ

5. राजेंद्र गावित - पालघर

6. गजानन कीर्तीकर - वायव्य मुंबई

7. संजय मंडलिक - कोल्हापूर

8. हेमंत गोडसे - नाशिक

9. प्रतापराव जाधव - बुलडाणा

10. धैर्यशील माने - हातकणंगले

11. सदाशिव लोखंडे - शिर्डी

12. कृपाल तुमाणे - रामटेक

13. भावना गवळी - यवतमाळ-वाशिम



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply