घृष्णेश्वर मंदिरात गाभाऱ्यात भाविकांना दर्शन Image Credit source: घृष्णेश्वर मंदिर संस्थान
Mahashivratri Verul Grishneshwar Temple: महाशिवरात्रीला भाविकांना प्रशासनाने मोठा दिलासा दिला आहे. वेरूळ येथील घृष्णेश्वर मंदिर मध्ये गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेता येणार आहे. महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर वेरुळ येथील बारावे ज्योतिर्लिंग असलेल्या घृष्णेश्वर मंदिरात येणाऱ्या लाखो शिवभक्तांसाठी मोठा दिलासा मिळाला आहे. महाशिवरात्रीला गर्दीचे कारण देत घृष्णेश्वराचे गाभाऱ्यातून दर्शन बंद करण्याचा प्रशासनाचा निर्णय अखेर मागे घेण्यात आला आहे.त्यामुळे भाविकांना पूर्वीप्रमाणे गाभाऱ्यात प्रवेश करून घृष्णेश्वराचे दर्शन आणि स्पर्श करता येणार आहे.
प्रशासनाकडून गाभार्यात जाण्यास बंदी
वेरूळ येथे 12 वे ज्योतिर्लिंग श्री घृषेश्वर मंदिर आहे. इथं महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते. मात्र या काळात मोठी गर्दी होते. 3 फेब्रुवारी रोजी झालेल्या बैठकीत गर्दी नियंत्रण, सुरक्षा आणि शिस्तबद्ध व्यवस्थापन लक्षात घेऊन गाभाऱ्याबाहेरून दर्शन देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे महाशिवरात्रीला श्री घृष्णेश्वराला हात लावून वा डोके टेकून दर्शन बंद ठेवण्याचा यापूर्वी निर्णय जाहीर झाला होता. भाविकांना गेल्या काही दिवसांपासून गाभाऱ्याच्या दरवाजातून दर्शन घ्यावे लागत होते. भाविकांना ओंकारेश्वर मंदिराच्या धर्तीवर घृष्णेश्वराचा जलाभिषेक बाहेरून करण्याचा आणि व्हिआयपी दर्शन बंद ठेवण्याचा निर्णयही प्रशासनाने घेतला होता. गावातील नागरिकांना आधार कार्ड दाखवून पहाटे सहा वाजेपर्यंत दर्शनाचा निर्णय झाला होता.
या निर्णयामुळे भाविकांमध्ये नाराजी पसरली होती. महाशिवरात्रीला भाविकांना बाहेरूनच दर्शन घ्यावे लागणार असल्याने भाविकांनी नाराजी व्यक्त केली होती. वेरुळ येथे 15 फेब्रुवारी रोजी यात्रा भरते. देशभरातून लाखो भाविक इथं येतात. गाभारा दर्शन ठेवल्यास भाविकांना चार ते पाच तास लागणार आहे. पण भाविक त्यासाठी राजी होते. त्यांनी याविषयी प्रशासनाकडे गाभारा दर्शन सुरू करण्याची मागणी केली होती.
प्रशासनाकडून निर्णय मागे
मात्र, घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाला स्पर्श करून दर्शन घेण्याची शेकडो वर्षांची परंपरा असल्याने स्थानिक लोकप्रतिनिधी व भाविकांनी तीव्र आक्षेप नोंदवला होता.भाविकांच्या धार्मिक भावना लक्षात घेऊन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी पूर्वीचा निर्णय मागे घेत सुधारित आदेश जारी केले. प्रशासनाच्या या निर्णयामुळे शिवभक्तांमध्ये समाधान व्यक्त होत असून, महाशिवरात्रीसाठी मंदिरात मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. तर महाशिवरात्रीला बाराव्या ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी आता वेळ लागण्याची शक्यता आहे. पण या नवीन आदेशाने भाविकांकडून आनंद व्यक्त केल्या जात आहे. त्यांनी जुना निर्णय मागे घेतल्याने आणि गाभाऱ्यात दर्शनासाठी परवानगी दिल्याने प्रशासनाचे आभार मानले आहे.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती



























Subscribe to my channel


