Maharashtra Weather Update : थंडी गायब! राज्यात गारपिटीसह पावसाची शक्यता, यलो अलर्ट जारी

Maharashtra Weather Update : हिवाळा सुरू असताना राज्यातील जनता पावसाळा अनुभवत आहे. राज्यातील जनता आता कुठे गुलाबी थंडीचा आनंद घेत होती तोवर तापमानात मोठे बदल झालेत. राज्यात कधी थंडी तर कधी पाऊस असा खेळ सुरू आहे. ऐन हिवाळ्यामध्ये राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये गारपीट, विजांच्या कडकडाटासह पाऊस पडत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. राज्यात आता आजपासून अवकाळी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. याचा परिणाम दक्षिण किनारपट्टीवर दिसून येत आहे. आता महाराष्ट्रावर देखील याचा परिणाम होत आहे. या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात आजपासून पाऊस पडण्याची शक्यता आहे. गुरुवारपासून पुढच्या ४८ तासांपर्यंत राज्याच्या मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र क्षेत्रामध्ये अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Mumbai Pune Hyperloop : भारताचा पहिला 'हायपरलूप प्रोजेक्ट'! मुंबई-पुणे प्रवास फक्त अर्ध्या तासात

राज्यातील तापमानामध्ये झालेल्या मोठ्या बदलामुळे बळीराजा चिंतेत आला आहे. ढगाळ वातावरण, पाऊस आणि गारपीट यामुळे शेतपिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रात तर हवामान खात्याने गारपिटीचा यलो अलर्ट दिला आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील शेतकरी आणि नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. राज्यात पुढील ३ दिवसांसाठी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. देशाच्या उत्तरेकडून येणारे थंड वारे आणि दक्षिणेकडून वाहणारे बाष्पयुक्त वारे यामुळं महाराष्ट्रात थंडीचा प्रभाव कमी होताना दिसत आहे.

दरम्यान, तर २८ डिसेंबरला विदर्भातली यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये पहाटेपर्यंत वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. या भागांमध्ये काही प्रमाणात गारपीट होण्याची देखील शक्यता आहे. २९ डिसेंबरला विदर्भ आणि मराठवाड्यातील काही तुरळक ठिकाणी वगळता राज्यातील बहुतांश भागांत स्थिर हवामान पहिला मिळेल आणि ३० डिसेंबरपासून पुन्हा थंडीत वाढ होण्याची शक्यता आहे.

 

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply