Maharashtra Weather Update : पुणे, साताऱ्यात ऑरेंज अलर्ट; पुढील चार दिवस राज्यातलं हवामान कसं असेल?

Maharashtra Weather Update : पुण्यासह राज्याला काल अवकाळ पावसानं झोडपलं आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी दाणादाण उडाली आहे. मात्र पुढचे चार दिवस राज्यात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवली आहे.  मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील  पुणे, सातारा, चंद्रपूर, यवतमाळ, लातूर, नांदेड  जिल्ह्यांमध्ये ऑरेंन्ज अलर्ट जारी करण्यात आला आहे.  11 ते 15 जूनपर्यंत राज्यातील अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली, उस्मानाबाद, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम जिल्ह्यांना ऑरेन्ज अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

मागील काही दिवसांपासून राज्यात उकाडा वाढला होता. काही जिल्ह्यांनी चाळीशी पार केली होती. तर सोलापूर आणि पुण्यात सर्वाधिक तापमानाची नोंद झाली होती. मात्र या पावसामुळे अनेक जिल्ह्यातील नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. पुढील काही दिवस  मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, गारपीट आणि सोसाट्याचा वारा (40-50 किमी प्रतितास वेग) पाऊस पडण्याची शक्यता आहे, अशी माहिती पुणे वेधशाळेचे प्रमुख हवामान तज्ञ के.एस.होसाळीकरांनी ट्विटरच्या म्हणजेच एक्सच्या माध्यमातून दिली आहे. 

Maharashtra Rain News : अवकाळीचा झटका, बळीराजाला फटका, पपईसह केळीच्या बागा भुईसपाट

मेघगर्जना विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, राज्यातील अनेक ठिकाणी हलका तर काही ठिकाणी मेघगर्जना विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. याचमुळे खबरदारी म्हणून काही जिल्ह्यांना येलो तर काही जिल्ह्यांना ऑरेन्ज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. 

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply