Maharashtra Weather Forecast : राज्यात अवकाळीचा कहर कायम; मराठवाडा, विदर्भात वादळी पावसाचा येलो अलर्ट

Maharashtra Weather Forecast : राज्यात अवकाळी पाऊस पाठ सोडत नसल्याचं दिसत आहे. भारतीय हवामान विभागाने पुणे आणि इतर अनेक विजांच्या कडकडाटासह वादळी पावसासाठी येलो अलर्ट जारी केला आहे. पुढील दोन दिवस सतर्कतेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. आज मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात वादळी वारे, विजांसह पावसाचा इशाराहवामान विभागाने दिला आहे. उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता देखील वर्तविली आहे.

सध्या पुण्यातील आकाश ढगाळ  आहे. तेथील तापमान 39 अंश सेल्सिअसपर्यंत वाढलेले आहे. आर्द्रता पातळी देखील गडगडाटी ढग तयार होण्यासाठी अनुकूल आहे. सायंकाळीवादळी पावसाची शक्यता आहे. राज्यात कमाल तापमान हंगामातील उच्चांकी पातळीवर पोचले आहे. राज्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस देखील हजेरी लावत  आहे. अकोला येथे हंगामातील उच्चांकी म्हणजेच ४४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

Unseasonal Rain : बळीराजावर आभाळ कोसळलं! राज्यभरात गारपीट, अवकाळीचा तडाखा; भाजीपाला, आंब्याच्या बागा उध्वस्त

आज मध्य महाराष्ट्रातील जळगाव, नगर, पुणे, नाशिक, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, बीड, लातूर, नांदेड, यवतमाळ, गडचिरोली जिल्ह्यात वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. २० एप्रिल रोजी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये अकोला येथे राज्यातील यंदाच्या हंगामातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे.

अकोला, चंद्रपूर, वाशीम, जळगाव, ब्रह्मपूरी येथील तापमान ४३ अंश सेल्सिअसच्या वर आहे. विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी कमाल तापमान पुन्हा ४२ अंशांपार आहे. आज राज्यात ढगाळ हवामानासह उन्हाचा चटका आणि उकाडा कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

तापमानाचा पारा वर चढत आहे. हवामान विभागाने महाराष्ट्रातील ठाणे, मुंबई आणि रायगड जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेची चेतावणी दिली आहे. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ४२ ते ४४ पर्यंत तापमान राहू शकते. अवकाळीमुळे  नागरिक वैतागले आहेत. या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply