Maharashtra Weather Forecast : उन्हाच्या झळांपासून मिळणार दिलासा; मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा

Maharashtra Weather Forecast : राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात तापमान वाढ होत आहे. एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात एकीकडे उन्हाचा चटका असह्य होत आहे तर दुसरीकडे वादळी पावसाला पोषक हवामान झालं आहे.राज्यात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला  आहे. तर उष्णतेची लाट कायम आहे.

सोलापूरमध्ये हंगामातील उच्चांकी म्हणजेच ४३.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज ७ एप्रिल रोजी विदर्भात उष्ण लाट तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये वादळी पावसाचा इशारा देण्यात आला  आहे. उद्यापासून म्हणजेच ८ एप्रिलपासून विदर्भ आणि मराठवाड्यात गारपिट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

Akola News : पोलिस अधिकारीच लाचेची रक्कम घेऊन पळाला, अकोल्यातील धक्कादायक घटना

आज मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, मध्य प्रदेश, विदर्भ, छत्तीसगड आणि कर्नाटकात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. दक्षिण छत्तीसगड विदर्भ, मराठवाडा, कर्नाटक, तमिळनाडू ते कोमोरिन भागापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा  सक्रिय आहे. राज्यात सध्या ढगाळ वातावरण आहे. उन्हाच्या झळा आणि उकाड्यामध्ये वाढ होत आहे.

आज मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात येलो अलर्ट  देण्यात आला आहे. तेथे अवकाळी पावसाची शक्यता  आहे. अरुणाचल प्रदेशच्या ईशान्य भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. उत्तर कर्नाटक, झारखंड, रायलसीमा, किनारी आंध्र प्रदेश आणि यानममध्ये उष्णतेची लाट निर्माण झाली आहे. हवामान विभागानं उद्या विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये गारपीट होण्याचा इशारा दिला आहे.

बिहारमध्ये 7 ते 8 एप्रिल दरम्यान मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. तरया काळात ओडिशात गारपिटीसह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान  विभागाने वर्तविला  आहे. आज विदर्भातील अमरावती आणि यवतमाळमध्ये उष्ण लाटेचा इशारा म्हणजेच येलो अलर्ट कायम आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply