Maharashtra Weather Alert : राज्यात पुढील ४ दिवसांत पावसाचा जोर वाढणार; कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोसळणार पाऊस?

Maharashtra Rain Updates: उशीरा का होईना राज्याच्या अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे. मुंबई, कोकण, पुण्यासह अनेक भागात पावसाच्या सरी कोसळत आहे. तर काही ठिकाणी अद्यापही मुसळधार पावसाची शक्यता आहे. अशातच पावसाची आस धरून बसलेल्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. येत्या ४ दिवसात राज्यात पावसाचा जोर वाढणार, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आजपासून पुढील ४ दिवस कोकणात मुसळधार पाऊस कोसळणार आहे, त्यामुळे कोकणाला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. याशिवाय मराठवाड्यासह विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज आहे. हवामान विभागाने मराठवाडा विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रात यलो अलर्ट दिला आहे.

राज्यात आज मुसळधार पावसाची शक्यता

राज्यातील कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदूर्ग या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पाऊस कोसळणार, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. याशिवाय पुणे आणि ठाण्यातही मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. दुसरीकडे मुंबईत आज पावसाचा जोर कमी होईल, असं हवामान खात्याने सांगितलं आहे.

मुंबईतील 26/11 चा हल्ल्याचा कट रचणारा दहशतवादी अब्दुल सलाम भुट्टावीचा मृत्यू, पाकिस्तानच्या तुरुंगात होता कैद

जगबुडीनदी धोक्याच्या पातळीला, प्रशासनाचा पहिला अलर्ट

कोकणासह रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याला सोमवारी (३ जुलै) दुपारनंतर मुसळधार पावसाने झोडपून काढलं. या पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यात खेड येथील जगबुडी नदीला पूर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जगबुडीनदी धोक्याच्या पातळी जवळ वाहत होती.

दरम्यान, जगबुडी नदी धोक्याच्या पातळीजवळ येऊन ठेपल्याचं लक्षात येता खेड नगरपरिषद प्रशासनाकडून खेड शहर परिसरातील जगबुडी नदीच्या नागरिकांना भोंगा वाजवून पहिला अलर्ट देण्यात आला आहे.दरवर्षी जगबुडी नदीच्या पाण्याची पातळी वाढली की नागरिकांना सूचना देण्यासाठी नगरपरिषदेकडून भोंगा वाजवला जातो. तसा अलर्ट यावर्षी पहिल्यांदाच देण्यात आला आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply