Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट

Mumbai : महाराष्ट्रातील उष्णतेचा पारा वाढण्यास आता सुरुवात झाली आहे. काल 4 मार्च रोजी उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता होती आणि कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाल्याचं पाहायला मिळाली. तर विदर्भातील अकोल्यात 38 अंशांपर्यंत सर्वाधिक तापमान नोंदवलं गेलं असून, तीव्र उन्हाचा तडाखा आजही जाणवणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे उष्णतेच्या लाटेच्या पूर्वसूचनांमुळे सावध राहण्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

उष्णतेचा यलो अलर्ट
मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. मुंबईत कमाल 33-37 अंश सेल्सियस, किमान 22-22 अंश राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. आर्द्रता जास्त असल्याने उकाडा तीव्र जाणवेल. त्यामुळे नागरिकांनी योग्य तीकाळजी घ्यावी. आज मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्याला उष्णतेचा यलो अलर्ट हवामान खात्याने दिला आहे.

उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच मुंबईत भट्टीची जाणीव
उन्हाळ्याची सुरुवातच मुंबईकरांसाठी उन्हाच्या तडाख्याने झाली आहे. सांताक्रूझ येथे बुधवारी 38.7 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली, तर कुलाबा येथे 35.7 अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले. यंदाच्या उन्हाळ्यात कोकण विभागात सरासरीपेक्षा अधिक तापमान असेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.

मुंबईमध्ये बुधवारी सांताक्रूझ येथे कमाल तापमानाचा पारा सरासरीपेक्षा 5.7 अंशांनी, तर कुलाबा येथे 4.5 अंशांनी अधिक होता. डहाणू येथे 6.2, तर अलिबाग येथे 4.2 अंशांनी कमाल तापमान अधिक नोंदले गेले. कोकण विभागात पालघर, ठाणे आणि रायगड या जिल्ह्यांना आज, गुरुवारीही उष्ण आणि आर्द्र वातावरणाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईमध्ये बुधवारच्या तुलनेत आज, गुरुवारी तापमानाचा ताप किंचित कमी होऊ शकेल.

किमान तापमानाचा पाराही चढा
24 तासांमध्ये तापमानाचा पारा एकाएकी चढल्याने मुंबईकरांना झळांची तीव्रता अधिक जाणवली. दुपारी उशिरापर्यंत मुंबईकरांनी गरम झळांची जाणीव होत असल्याचे निरीक्षण नोंदवले. आर्द्रता वाढल्याने किमान तापमानाचा पाराही चढा होता. कुलाबा येथे काल बुधवारी 24 अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदले गेले, तर सांताक्रूझ येथे 22.6 किमान तापमानाची नोंद झाली. दोन्ही केंद्रांवर अनुक्रमे 2.3 आणि 2.6 अंश सेल्सिअसने सरासरीपेक्षा किमान तापमान अधिक असल्याची नोंद झाली. डहाणू येथे किमान तापमान सरासरीपेक्षा 3.2 अंशांनी अधिक होते. प्रत्यावर्ती चक्रीय वातस्थिती आणि पूर्वेकडून येणारे वारे यामुळे कोकण विभागातील तापमान आणि आर्द्रता वाढली. ही प्रत्यावर्ती चक्रीय वातस्थिती आज, गुरुवारपर्यंत थोडी दूर जाईल. त्यामुळे मुंबईमध्ये उष्मा कमी जाणवेल, असा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाच्या अधिकारी सुषमा नायर यांनी वर्तवला.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *