Maharashtra Unseasonal Rain Update : राज्यात पुढील 5 दिवस विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस, 'या' भागात गारपिटीची शक्यता!

राज्यावर सध्या अवकाळी पावसाचे संकट आहे. या पावसामुळे शेतपिकाचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी चिंतेत आला आहे. अशामध्ये आता शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढणार आहे. कारण पुढचे पाच दिवस राज्यातील अनेक भागामध्ये अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात पुढील पाच दिवस अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यातील मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये 15 एप्रिलपर्यंत विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस पडेल.

त्याचसोबत अनेक भागांमध्ये गारपिट होण्याची शक्यता आहे. त्याचसोबत विदर्भातील काही ठिकाणी हलक्या स्वरुपाचा पाऊस पडेल. अशामध्ये या भागातील शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी काळजी घ्यावी. तसंच शेतकऱ्यांनी आपला शेतमाल सुरक्षित ठिकाणी ठेवावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

राज्यातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. अवकाळी पावसामुळे शेतातील पिकांचे आणि शेतमालाचे मोठे नुकसान झाल्यामुळे शेतकरी चिंतेत आला आहे. राज्यातील मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह अवकाळी पाऊस पडत आहे. तर काही ठिकाणी गारपिट देखील होत आहे.

अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला गेला. या पावसामुळे शेतकऱ्यांचे द्राक्ष, कलिंगड, खरबूज, टोमॅटो, कांदा, बाजरी, गहू, फळभाज्या आणि पालेभाज्या या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. फक्त शेतीचेच नाही तर पशुधनाचे देखील नुकसान झाल्यामुळे शेतकरी चिंतेत आला आहे.

अनेक ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यामुळे घरांचे देखील नुकसान झाले आहे. तर राज्यामध्ये अवकाळी पावसामामुळे अंगावर वीज पडून आणि झाड कोसळून अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी मंत्र्यांकडून सुरु आहे. तर सरकारने नुकसानग्रस्त भागांमध्ये पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply