Maharashtra Udyog Ratna Award : राज्य सरकारचा पहिलाच 'उद्योग रत्न' पुरस्कार रतन टाटा यांना जाहीर

Maharashtra Udyog Ratna Award: राज्य सरकाराच्या वतीने महाराष्ट्र भूषण हा सर्वोच्च पुरस्कार दिला जातो. याच धर्तीवर महाराष्ट्र शासन उद्योग रत्न पुरस्कार सुरु सरकार सुरु करणार असून याचा पहिला पुरस्कार हा प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांना जाहीर झाल्याचं समजतंय.

कला,साहित्य, विज्ञान अशा विविध क्षेत्रांमध्ये नावलौकिक मिळवणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरवण्यात येते. याच धर्तीवर उद्योग रत्न पुरस्कार सरकारच्या वतीने सुरु करण्यात येणार आहे. या पुरस्काराचे नेमके स्वरूप काय असणार आहे, हे अद्याप समजू शकलेलं नाही.

उद्योग रत्न' जाहीर झालेले रतन टाटा यांचा जन्म 28 डिसेंबर 1937 रोजी मुंबईत झाला. वास्तुविशारद बनण्याचे रतन टाटा यांचे बालपणीचे स्वप्न होते. त्यांच्या वडिलांचे नाव नवल टाटा आणि आईचे नाव सोनू टाटा होते. नवल टाटा हे जमशेदजी टाटा यांचा धाकटा मुलगा होते. रतन टाटा हे त्यांचे दत्तक घेतलेला मुलगा होता. जमशेदजी टाटा हे टाटा कंपन्यांचे संस्थापक होते. 

1948 मध्ये रतन टाटा दहा वर्षांचे असताना त्यांच्या आई वडिलांचे घटस्फोट झाले. आणि त्यानंतर, त्यांचे पालनपोषन त्यांच्या आजी नवाजबाई टाटा यांनी केले. त्यांनी चॅम्पियन स्कूल, मुंबई येथून प्राथमिक शिक्षण पूर्ण केले आणि आर्किटेक्ट होण्याच्या इच्छेने रतन टाटा अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठामध्ये दाखल झाले.

Mumbai-Pune Expressway Landslide : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर पुन्हा दरड कोसळली; मुंबईकडे जाणारी वाहतूक विस्कळीत

रतन टाटा 1961 मध्ये टाटा समूहात सामील झाले आणि 1991 मध्ये त्यांनी समूहाचे अध्यक्षपद स्वीकारले. डिसेंबर २०१२ पर्यंत त्यांनी या गटाचे नेतृत्व केले.

सध्या ते टाटा समूहाच्या अंतरिम अध्यक्षपदावर आहेत. आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीला रतन टाटा टाटा स्टीलच्या कारखान्यातील चुनखडी काढायचे आणि ब्लास्ट फर्नेस हाताळायचे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply