Maharashtra Rainfall : मान्सूनचा राज्यातून निरोप, पण वादळी पावसाचा इशारा; पुढचे ४ दिवस धो-धो कोसळणार

Maharashtra Heavy Rainfall : मागील काही दिवसांपासून राज्यामधील वातावरणामध्ये मोठा बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे. पावसाळ्यानंतर आता राज्यातील हवामान पूर्णपणे कोरडे आहे. महाराष्ट्रामधून नैऋत्य मान्सूनने निरोप घेतला आहे. महाराष्ट्रासह इतर काही राज्यांमध्ये पुढील दोन ते तीन दिवसांत नैऋत्य मान्सून परतण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या राज्यामधील वातावरण कोरडे आहे. १५ ऑक्टोबरपासून राज्यातील हवामानात परत एकदा बदल होणे अपेक्षित आहे. १५ ऑक्टोबरपासून किमान १८ ऑक्टोबरपर्यंत राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात आभाळी हवामान आणि दुपारनंतरचा वादळी पाऊस अपेक्षित आहे.

सध्याच्या हवामान खात्याच्या अंदाजानुसार, वादळी पावसाची सर्वात अधिक शक्यता आणि प्रमाण हे विदर्भ आणि मराठवाड्यात असू शकते. यादरम्यान तेथील अनेक भागांमध्ये ढगाळ हवामान अथवा वादळी पावसाची शक्यता राहील. या तुलनेमध्ये खानदेश आणि मध्य महाराष्ट्रात विखुरलेल्या स्वरूपाचा वादळी पाऊस पडू शकतो.

१५ ऑक्टोबरपासून राज्यात वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पावसाचा परिणाम शेतीवर होत असल्याने शेतकऱ्यांनी हवामानाच्या स्थितीनुसार नियोजन करावे आणि काढणी केलेल्या पिकांना वादळी पाऊस आणि वाऱ्यापासून सुरक्षित ठेवावे असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहेत.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *