Maharashtra Rain Update : अवेळी कोसळधार! राज्यात अनेक ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी, पुढील ३ तास महत्वाचे, अलर्ट राहा!

Maharashtra Rain Update : राज्यात आज सकाळपासून अनेक जिल्ह्यांत पावसाने हजेरी लावली आहे. हिवाळ्यात कडाक्याच्या थंडी ऐवजी मुसळधार पाऊस कोसळत आहे. रायगडमध्ये जोरदार पाऊसाने हजेरी लावलीये. पावसामुळे भात शेतीच नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

सकाळपासून उन्हाने दडी मारल्याने रायगडमध्ये ढगाळ वातावरण निर्माण झालं होतं. रायगड जिल्ह्यातील पोलादपुर, महाड, माणगाव, पाली परीसराला पावसाने झोडपले आहे. शेतात कापून ठेवलेले भाता पिक पावसाच्या पाण्यात बुडून गेलेय.

Pune Crime News : पुण्यात कोरियन नागरिकाच्या घरावर गोळीबार; औंध परिसरातील घटना, पोलिसांत गुन्हा दाखल

या वर्षी उशिरा सुरु झालेल्या पावसाने शेतकऱ्याची चिंता वाढवली होती. मात्र पाऊस जरी उशिरा सुरु झाला असलातरी प्रमाणात पडल्याने भातशेतीची पिके चांगली आली होती. परंतु आज दुपारी अचानक सुरु झालेल्या पावसाने पोलादपुर, महाड, माणगाव, म्हसळा, रोहा, सुधागड तालुक्यांना चांगलेच झोडपलेय.

अचानक आलेल्या या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर सर्वात मोठा फटका येथील शेतकऱ्याला बसलाय. भाताचे पिक तयार झाले असून अनेक ठिकाणी कापलेले भाताचे पिक शेतात वाळवण्यासाठी ठेवलेले आहे. अचानक आलेल्या या पावसामुळे भात पिकाचे मोठे नुकसान झाले असून येथील शेतकरी हवालदिल झाला आहे.

बुधवारी पहाटेपासूनच कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू झालाय . हातकणंगले तालुक्यातील घुणकी या गावात मुसळधार पाऊस पडल्याने संपूर्ण गाव तसेच शेतांमध्ये पाणीच पाणी झालेय. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रामध्येही मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. त्यानुसार, आज पहाटेपासूनच कोल्हापूर जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली.

यासह सांगली जिल्ह्यातील शिराळा, जत, पलूस, तासगाव,खानापूर तालुक्यात पावसाने हजेरी लावलीये. दिवाळीत थंडी सुरू होण्याची अपेक्षा असताना पावसाचे आगमन छाटणी झालेल्या आणि फुलोऱ्यात आलेल्या द्राक्ष बागांना धोका ठरणारे आहे. जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ हवामान असून काही भागात हलका ते मध्यम पाऊस झाला.

शिराळा तालुक्यातील मांगले परिसरात पहाटेपासून पाऊस सुरु होता. तासगाव, पलूस, खानापूर, जत भागात पहाटेपासून पावसाला सुरुवात झाली. सुमारे अर्धातास हलका पाऊस पडला. द्राक्षाच्या फळछाटण्या झाल्या असून सध्या द्राक्ष घड कळी, फुलोऱ्याच्या स्थितीत असून यामध्ये पावसाचे पाणी साचल्याने बुरशीजन्य दावण्या रोगाचा प्रादुर्भाव बळावण्याची शक्यता आहे.

आज सकाळी पंढरपूर आणि परिसरात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. सध्या थंडीचे दिवस सुरु असतानाच अवकाळी पाऊस झालाय. तालुक्यातील निमगाव, उपरी या भागात चांगला पाऊस झाला. अचानक आलेल्या पावसामुळे ऊस तोडीच्या कामांवर परिणाम झाला आहे.

पुढील ३ तास महत्वाचे

पुणे, सातारा, अहमदनगर, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धाराशिव, बीड, लातूर, नांदेड या जिल्ह्यांमध्ये पुढील ३ तासांत जोरदार पाऊस बरसण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

दिवाळी सणाच्या पूर्वसंध्येला अहमदनगर शहरात देखील पावसाने हजेरी लावलीये. सावेडी परिसरासह उपनगरात मुसळधार पावसाच्या सरी बरसल्यात. अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply