Maharashtra Rain Alert : पुण्यासह ४ जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट, तर मुंबई-कोल्हापूरसह ९ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

Weather Rain Forecast : राज्यातील काही भागांत मागील काही दिवसांपासून जोरदार पाऊस बरसत आहे. अनेक भागात पूरसदृश परिस्थिती आहे. काही धरणांच्या पाणीपातळीतही चांगलीच वाढ झाली आहे. पुढील काही दिवस पाऊस कसा असेल याकडे सर्वांचं लक्ष आहेत.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कोकणातील काही भाग आणि मध्य महाराष्ट्राच्या लगतच्या घाट भागात पुढील 2-3 दिवसांमध्ये सक्रिय मान्सूनची स्थिती कायम राहील. या भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

मुंबई हवामान विभागाच्या अंदाजानुसार, उद्या चार जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. ९ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आली आहे. तर २० जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. 

Pune : पुण्यात अटक केलेल्या दहतवाद्यांकडून धक्कादायक माहिती उघड, जंगलात केली होती बॉम्बस्फोटाची चाचणी, ATSची माहिती

कोणत्या जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंज अलर्ट

उद्या रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा या जिल्ह्यांमध्ये अत्यंत जोरदार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर पालघर, मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, नांदेड, भंडारा, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply