Maharashtra politics : मराठी भाषेच्या अस्मितेचा वाद टोकदार, शिंदेंनी दिला 'जय गुजरात'चा नारा

Why Eknath Shinde said Jai Gujarat in Pune event : राज्यात मराठीवरुन वाद पेटला असतानाच एकनाथ शिंदेंनी थेट जय गुजरातचा नारा दिलाय... त्यावरुन राज्यातील वातावरण तापलंय. एकनाथ शिंदे.... उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे... मात्र पुण्यातल्या कार्यक्रमात गुणगान करताहेत गुजरातचं....हिंदीसक्तीविरोधात चकार शब्द न काढणाऱ्या एकनाथ शिंदेंचं अमित शाहांसमोर मात्र गुजरात प्रेम चांगलंच उफाळून आलं. त्यावरचाच हा स्पेशल रिपोर्ट....

राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनीच जय गुजरातची घोषणा दिल्यानंतर विरोधकांनी टीकेची झोड उठवलीय.संजय राऊतांनीही डुप्लिकेट शिवसेनेचं गुजराती रुप समोर आल्याची टीका केलीय.. तर ऐशा नरा मोजूनी माराव्या पैचरा, म्हणत संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केलाय.तर शिंदें गटाच्या उदय सामंताची मात्र गुजरात प्रेमावरील सारवासारव करण्यासाठी तारांबळ उडालीय.

MNS worker Detained : मनसैनिकांना दादरमध्ये घेतलं ताब्यात, मुंबईतील वातावरण तापलं, हजारो कार्यकर्ते जल्लोष करत रवाना

राज्य सरकारच्या हिंदीसक्तीला अजित पवारांनी उघडपणे विरोध केला...मात्र शिंदे अखेरपर्यंत हिंदीसक्तीचं समर्थन करत राहिले. मात्र आता फक्त हिंदीचं समर्थनच नाही तर अमित शाहांचं कौतूक करताना शिंदेंना आपण मुंबईसह महाराष्ट्राला विरोध करणाऱ्या गुजरातचाच नारा देत असल्याचंही भान राहिलं नाही.... त्यामुळे मराठी भाषेच्या अस्मितेचा वाद टोकदार झाला असताना शिंदेंचं गुजरातप्रेम त्यांच्या अंगलट येणार हे मात्र निश्चित.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *