Maharashtra Politics : अजित पवार यांच्या 'राष्ट्रवादी'ला सर्वात मोठं खिंडार; शेकडो पदाधिकारी शरद पवारांकडे परतले

Maharashtra Politics : राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येते आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सर्वात मोठं खिंडार पडलं आहे. कारण, नाशिकमधील तब्बल १०० पदाधिकारी आज शरद पवार यांची भेट घेतली आहे. बारामती येथील गोविंद बागेत ही भेट झाल्याचं कळतंय. या भेटीनंतर शेकडो पदाधिकाऱ्यांनी शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश केला आहे.

अजित पवार यांच्यासह काही आमदारांनी भाजपसोबत हातमिळवणी केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन गट पडले. त्यानंतर शरद पवार यांनी नव्या दमाने मैदानात उतरून पक्ष उभारणीला सुरुवात केली. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र पिंजून काढत शरद पवारांनी तब्बल ८ आमदार निवडून आणले. दुसरीकडे अजित पवार यांच्या पक्षाला फक्त एका जागेवरच विजय मिळवता आहे.

Raigad Accident : रायगडमध्ये २ एसटी बसची समोरासमोर धडक, चालकांसह १५ ते २० प्रवासी जखमी

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता वारं फिरलं असून अजित पवार यांच्यासोबत गेलेले अनेक पदाधिकारी पुन्हा शरद पवार यांच्याकडे परतत आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीचं चांगलंच टेन्शन वाढलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नाशिकचे तब्बल १०० पदाधिकारी बारामतीत दाखल झाले.

यामध्ये अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष नानासाहेब महाले यांचाही समावेश होता. बारामतीच्या गोविंद बागेत शरद पवारांची भेट घेण्यासाठी हे कार्यकर्ते ठाण मांडून होते. दरम्यान, या कार्यकर्त्यांचा मानसन्मान राखत शरद पवार यांनी देखील त्यांची भेट घेतली. त्यानंतर या पदाधिकाऱ्यांनी अजित पवार यांची साथ सोडून थेट शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश केला.

दुसरीकडे पंढरपूर तालुक्यात बीआरएसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. भारत भालके यांचे सुपुत्र भगीरथ भालके यांनी आज शरद पवारांची भेट घेतली आहे. काही दिवसापूर्वी राष्ट्रवादी सोडून भालके बीआरएस मध्ये गेले होते. आज गोविंद बागेत भालके यांनी शरद पवार यांची भेट घेऊन महत्वाची चर्चा केली आहे. पंढरपूर तालुक्याच्या संदर्भात आपण चर्चा करण्यासाठी आलो होतो, अशी प्रतिक्रिया भालके यांनी दिली आहे.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply