Maharashtra Politics : गोंदियामध्ये भाजपला धक्का! माजी आमदाराने ठोकला पक्षाला रामराम; नाना पटोलेंची घेतली होती भेट

Maharashtra Politics : गोंदिया जिल्ह्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. गोंदिया विधानसभेवर शिवसेनेकडून दोन वेळा आमदार राहिलेले व सध्या भाजपमध्ये असलेले माजी आमदार रमेश कुथे यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, गोंदिया जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला आहे. गोंदिया विधानसभेवर शिवसेनेकडून दोन वेळा आमदार राहिलेले व सध्या भाजपमध्ये असलेले माजी आमदार रमेश कुथे यांनी भाजपचा प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

OBC Reservation : आरक्षणाचा तिढा सुटणार? ओबीसींचं शिष्टमंडळ जाणार मुंबईला, हाकेंच्या शिष्टमंडळात 'या' बड्या नेत्यांचा समावेश

"माझ्या समर्थकांकडून मला भाजपपासून दुर होण्याचा आग्रह केला जात आहे. त्यामुळे मी भाजप पासून दुर होत आहे." असे राजीनामा पत्र रमेश कुथे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पाठविला आहे.

विशेष म्हणजे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आठवड्या भरापूर्वीच मध्यरात्रीच्या सुमारास रमेश कुथे यांच्या घरी जाऊन भेट घेतली होती. त्यानंतर गोंदिया जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. अखेर रमेश कुथे यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. मात्र त्यांनी पक्षप्रवेशा संदर्भात अद्याप कुठलीही माहिती दिलेली नाही

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply