Maharashtra Politics : चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली राज ठाकरेंची भेट; तब्बल सव्वा तासांच्या भेटीत काय चर्चा झाली?

Maharashtra Politics : राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पाचवा टप्प्यासाठी प्रचारसभा सुरु झाल्या आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी सभा, रोड शो, बैठकांचा धडाका लावला आहे. या पाचव्या टप्प्यात मुंबईचाही समावेश आहे. मुंबईतील मराठी मते वळविण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी सुरु केले आहेत. भाजपनेही या मतांसाठी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. दोघांच्या सव्वा तासांच्या भेटीत लोकसभा निवडणुकीसाठीच्या महत्वाच्या मुद्यांवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबईतील मराठी मतांचा टक्का वाढविण्याासाठी महायुतीकडून प्रयत्न केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर बावनकुळे यांनी राज ठाकरेंची भेट घेतली. या भेटीत मुंबई, ठाण्यातील मराठी मतांचा टक्का कशा पद्धतीने वळवता येईल, यावर बावनकुळे आणि राज ठाकरे यांच्यात चर्चा झाली.

PM Modi Roadshow : PM मोदींचा मुंबईत रोडशो, ड्रोन- पंतग आणि फुगे उडवण्यास बंदी

तसेच मुंबई, ठाणे, नाशिक या भागांमध्ये असणारे मनसेचे मतदार कशा पद्धतीने वळवली जातील, तसेच १७ तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा शिवाजी पार्क या ठिकाणी पार पडणार आहे. या सभेसाठी देखील राज ठाकरेंना निमंत्रण देण्यात आले आहेत. शेवटच्या दिवशी देखील राज ठाकरे यांनी मुंबईत प्रचार करावा, यासंदर्भात चर्चा झाली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply