Maharashtra Politics : काँग्रेसला मोठं खिंडार ! नाशिकच्या माजी जिल्हाध्यक्षांचा पक्षाला रामराम; भाजपमध्ये केला प्रवेश

Maharashtra Politics : राज्यात सध्या लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. एकीकडे लोकसभेचा प्रचार शिगेला पोहोचला असतानाच धुळ्यामध्ये काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. नाशिकचे माजी जिल्हाध्यक्ष, काँग्रेस नेते तुषार शेवाळेंनी पक्षाला रामराम ठोकत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. उमेदवारीवरुन नाराज असल्याने त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्याचे बोलले जात आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, काँग्रेसचे नाशिकचे माजी जिल्हाध्यक्ष तुषार शेवाळेंनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते हा पक्ष प्रवेश पार पडला. तुषार शेवाळे यांच्यासह त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनीही भारतीय जनता पक्षात यावेळी प्रवेश केला.

Amravati News : भारतीय सैन्य दलातील जवानाने संपविले जीवन; आजारी वडिलांना भेटण्यासाठी आले होते सुटीवर

मालेगाव लोकसभा मतदार संघातून लोकसभा लढवण्यास तुषार शेवाळे हे इच्छुक होते. मात्र काँग्रेसतर्फे लोकसभेची उमेदवारी न मिळाल्याने डॉ. तुषार शेवाळे हे नाराज होते. याच नाराजीतून त्यांनी नाशिक जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामाही दिला होता. त्यानंतर आज त्यांनी भाजप प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.

"माझा मित्रपरिवार मोठा आहे. असंख्य कार्यकर्ते आहेत. ही सर्व मोठी ताकद मी भाजपच्या मागे उभी करणार आहे. माझी भारतीय जनता पक्षामध्ये काम करण्याची इच्छा होती. त्यामुळे मी पक्ष सोडला," अशी प्रतिक्रिया यावेळी तुषार शेवाळे यांनी दिली. दरम्यान, एकीकडे लोकसभेचा प्रचार शिगेला पोहोचला असतानाच तुषार शेवाळे यांनी साथ सोडल्याने काँग्रेसला मोठा धक्का हा मानला जात आहे. तसेच धुळे लोकसभा मतदारसंघात काँग्रेसला मोठं खिंडार पडले आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply