Maharashtra Politics : अंतरवाली सराटीत राजकीय खलबतं? जय पवारांनी अचानक घेतली मनोज जरांगेंची भेट, चर्चांना उधाण

 

Maharashtra Politics : अंतरवाली सराटीमधून मोठी बातमी समोर येत आहे. आज अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांनी अचानक मनोज जरांगेची भेट घेतली आहे. .यावेळी जय पवार यांच्यासोबत सूरज चव्हाण देखील असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. जय पवार आणि जरांगे यांच्या भेटीमुळं राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. या भेटीमुळे अंतरवाली सराटीत राजकीय खलबतं शिजत आहेत का, असा प्रश्न आता निर्माण होत आहे.

तर अंतरवाली सराटीमध्ये आज मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी जय पवार यांचं स्वागत केल्याची माहिती मिळत आहे. अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार आज अचानक अंतरवाली सराटीमध्ये दाखल झाले. त्यानंतर त्यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतल्याची माहिती मिळत आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांच्या भेटीगाठीचं सत्र सुरूच असल्याचं दिसतं. त्याचदरम्यान ही भेट झाल्याने चर्चांना उधाण आलं आहे.

Akola News : बड्या डॉक्टरांविरुद्ध होती तक्रार; पोलिसांनी महिलेला रात्री २ वाजेपर्यत ठाण्यातचं ठेवले बसवून, कारवाईच्या दिल्या धमक्या

आज उपमुख्यमंत्री अजित पवार  यांचे पुत्र जय पवार हे हेलिकॉप्टरने छत्रपती संभाजीनगरला आले होते. माध्यमांना न कळवता ते थेट कारने अंतरवाली सराटीमध्ये दाखल झाले होते. त्याठिकाणी तब्बल अर्धा तास त्यांनी मनोज जरांगे पाटलांची वाट पाहिल्याची माहिती मिळत आहे. त्यानंतर जरांगे पाटील आल्यानंतर त्यांनी जय पवार यांची भेट घेतली. यावेळी दोघांनीही एकमेकांचं स्वागत  केलं.

आंतरवली सराटी येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार आणि सूरज चव्हाण यांनी आज मनोज जरंगे पाटील यांची सदिच्छा भेट घेतली आहे. मात्र, यावेळी जरांगे पाटील आणि जय पवार यांच्यात  कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याची माहिती मिळत आहे. तरीही राजकीय वर्तुळात चर्चांना मात्र उधाण आलं आहे. या भेटीमुळे आता अंतरवाली सराटीमध्ये नेमकी कोणती राजकीय खलबतं सुरू आहेत, अशी सगळ्यांना उत्सुकता लागली आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply