Maharashtra Politics : ' साहेब, तुम्ही ठरवाल ते धोरण'; PM मोदींना पाठिंबा दिल्यानंतर मनसैनिकाचं राज ठाकरेंना भावनिक पत्र

Maharashtra Politics : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला, त्यांनी गुढीपाडव्या मेळाव्यामध्ये जाहीरपणे पंतप्रधान मोदींना बिनशर्थ पाठिंबा देत असल्याचं सांगितलं. त्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. राज ठाकरे यांच्या निर्णयानंतर मनसे पदाधिकारी  कार्यकर्त्यांमध्ये 'कही खुशी कही गम'चं वातावरण दिसून आलं.  

राज ठाकरे यांच्या भूमिकेनंतर काही मनसे  पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली तर काही मनसे पदाधिकाऱ्यांनी त्यांना समर्थन केलं आहे. आता सोशल मीडियावर राज ठाकरे यांच्या समर्थनार्थ एक पत्र व्हायरल होत आहे. मनसेच्या पंतप्रधान मोदींना पाठिंब्याच्या भूमिकेमुळे काही जणांनी नाराजी व्यक्त करत राजीनामा दिला, तर आता त्यांना सर्मथन देणारे पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पंतप्रधान मोदींना पाठिंबा दिल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांना लिहिलेलं पत्र व्हायरल होत आहे. आपण जो आदेश आम्हाला देणार ते आमच्यासाठी शिरसंवाद असणार आहे  आणि ते कायम राहील, 2006 पासून आमच्यासाठी तुम्ही ठरवाल ते धोरण आणि तुम्ही बांधलं ते तोरण, असं मनसे सैनिकांनी या पत्रात लिहिलेलं आहे.

MNS Activist Letter

नेमकं पत्रात आहे तरी काय?

प्रति, राजसाहेब ठाकरे, संस्थापक, अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आदरणीय साहेब, सर्वप्रथम तुम्हाला सस्नेह जय महाराष्ट्र! नुकताच आपला गुढीपाडवा मेळावा शिवतीर्थावर साजरा झाला. या मेळाव्यात आपण जी भूमिका घेतली, ती अतिशय योग्य असून आम्हाला आपण घेतलेली भूमिका मनापासून मान्य आहे.

आपला आदेश आम्हाला शिरसावंद्य होता,  आहे आणि राहील व आपल्या आदेशाचे आम्ही तंतोतंत पालन करु.साहेब, २००६ पासून आम्ही तुम्ही ठरवाल ते धोरण आणि तुम्ही बांधाल ते तोरण साच वाक्यानुरूप वाटचाल करत आलोय आणि यापुढेही सात तसूभरही बदल होणार नाही. आपलाच, महाराष्ट्र सैनिक' असं ते पत्र आहे. सध्या हे पत्र सोशल मीडियावर चांगलं व्हायरल होत आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply