Maharashtra Politics : 2 कोटीच्या गाडीत फिरायचं आणि 17 रुपयांची साडी वाटायची; बच्चू कडूंचे नवणीत राणांवर टीकास्त्र

Maharashtra Politics : संपूर्ण राज्यामध्ये लोकसभा निवडणूकीची रणधुमाळी पाहायला मिळतेय. याच पार्श्वभू्मीवर सध्या अमरावतीमध्ये राजकीय वातावरण तापलं आहे. राणा दाम्पत्याने मेळघाटमध्ये आदिवासी महिलांनी साड्या वाटल्या होत्या. त्यावरून आमदार बच्चू कडू यांची राणा दाम्पत्यांवर सडकून टीका केली  आहे. आदिवासी महिलांनी नवनीत राणांनी दिलेल्या साड्यांची होळी केली होती. निकृष्ट दर्जाच्या साड्या वाटल्याचा आरोप त्यांनी केली होता. या साडी वाटपावरून मेळघाटामध्ये चांगलंच वातावरण तापलं होतं. त्यावरून आता बच्चू कडूंनी त्यांचा समाचार घेतला आहे.

अमरावतीत लोकसभा निवडणूकीचं वातावरण तापल्याचं दिसतंय. प्रहारचे उमेदवार दिनेश बुब यांच्या प्रचारार्थ बच्चू कडू यांनी कार्यकर्ता मेळावा घेतला. या मेळाव्यात आमदार बच्चू कडू यांची राणा  दाम्पत्यावर सडकून टीका केली आहे. 17 रुपयांची साडी देऊन मेळघाटची बेईज्जती केली, असं त्यांनी  म्हटलं आहे.

Mumbai News : पोट दुखतंय म्हणून दवाखान्यात गेली, रिपोर्ट्सही नॉर्मल आले; मात्र ऑपरेशन करताना डॉक्टरही हादरले

2 कोटीच्या गाडीत फिरायचं आणि 17 रुपयाच्या साडीने लोकांना गुलामीकडे नेण्याची व्यवस्था तोडून टाका, असा टोला यावेळी बोलताना बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्याला लगावला  आहे. 17 रूपयाची साडी मत परिवर्तन करू शकत नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे.

भाजपने अंतर्गत विरोध डावलुन महायुतीच्या नेत्यांना विश्वासात न घेता अमरावतीत नवनीत राणा यांना उमेदवारी दिली आहे. नवनीत राणांना दिलेली उमेदवारी आता मोठी डोकेदुखी ठरत असल्याचं दिसतंय. नवनीत राणा यांचं डिपॉझिट जप्त करण्याची तयारी असल्याची घोषणाच प्रहार जनशक्तीचे नेते बच्चू कडू यांनी केली आहे.

बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाकडे अमरावती लोकसभा मतदार संघामध्ये दोन विधानसभा मतदार संघ आहे. प्रहारने शिवसैनिक दिनेश बूब यांना उमेदवारी देत या ठिकाणी तिरंगी लढत करण्याचा निर्धार व्यक्त केलाय. प्रहारचा भाजप उमेदवार नवनीत राणा यांच्या विरोधातील संघर्ष टोकाला जात आहे.

भाजप अंतर्गत नवनीत राणा उमेदवाराबद्दल तीव्र नापसंती आहे. आता नवनीत राणा यांच्यासमोर मोठं आव्हान निर्माण झालं आहे. बच्चु कडूंनी दोन लाखांच्या मतांनी पराभूत  करु, वेळप्रसंगी नवनीत राणांचं डिपॉझिट जप्त करु असा इशारा देखील दिला आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply