Maharashtra Politics : अमरावतीत आज महाविकास आघाडीचे जोरदार शक्तीप्रदर्शन, बळवंत वानखडे नामांकन अर्ज दाखल करणार

Maharashtra Politics : अमरावती लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे  उमेदवार बळवंत वानखडे आज आपला नामांकन अर्ज दाखल करणार आहेत. बळवंत वानखडे यांचा अर्ज दाखल करण्यासाठी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे उपस्थित राहणार आहेत. आज अमरावतीमध्ये महाविकास आघाडी जोरदार शक्तीप्रदर्शन करणा आहे. 

मला कोणत्याही उमेदवारांचे आव्हान नसणार. माझा विजय हा एकतर्फी राहील, असा विश्वास बळवंत वानखडे यांनी व्यक्त केला आहे. खासदार नवनीत राणा तीन लाख मतांनी विजयी  नाही, तर पराभूत होतील असंही वक्तव्य त्यांनी केलं आहे. सध्या लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्ह्यातील वातावरण तापलेलं आहे.

Dadar Railway Station Threat Call : दादर रेल्वे स्टेशन उडवून देण्याची धमकी; मध्यरात्री धमकीचा फोन

महाविकास आघाडी जोरदार शक्तिप्रदर्शन करणार

अमरावती जिल्ह्यात महाविकास आघाडीची काय ताकद आहे, हे आज विरोधकांना दाखवून देऊ असंही बळवंत वानखेडे यांनी म्हटलं आहे. आज अमरावतीत महाविकास आघाडी वतीने नेहरू मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत महारॅली काढली काढणार  आहे. आज अमरावतीत महाविकास आघाडी जोरदार शक्तिप्रदर्शन करणार आहे.

राज्यात लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे  यांनी २६ मार्च रोजी प्रचाराचा नारळ फोडून थेट विजयासाठी अंबादेवीला साकडं घातलं आहे.

महाविकास आघाडीच्या वतीने अमरावती लोकसभेसाठी काँग्रेसचे आमदार बळवंत वानखडेंना उमेदवारी जाहीर करण्यात आलीय. त्यांनी अमरावतीचे आराध्य दैवत अंबादेवी आणि एकवीरा देवीची महाआरती करून प्रचार  सुरू केलाय.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply