Maharashtra Politics : "कहो दिल से, नितीन गडकरी फिर से"; भित्तीचित्र रंगवत गडकरींनी प्रचाराचा फोडला नारळ

Maharashtra Politics : लोकसभा मतदारसंघासाठी भाजपकडून केंद्रीय मंत्री आणि विद्यमान खासदार नितीन गडकरी यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. दोनवेळेला नागपूरमधून निवडणूक जिंकलेले नितीन गडकरी तिसऱ्यांदा नागपुरातून निवडणुकीच्या मैदानात उतरले आहे. नागपूरमध्ये त्यांच्या प्रचाराची सुरूवात झाली आहे.  

भाजपच्या प्रचाराने अजून जोर धरलेला नसला, तरी नितीन गडकरी यांनी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये प्रचार सुरू केला आहे. याच मालिकेत त्यांनी त्यांच्या घराच्या खाली भिंतीवर "कहो दिल से, नितीन गडकरी फिर से" अशा आशयाचा भित्तीचित्र रंगवत एका प्रकारे प्रचाराचा नारळ फोडला  आहे.

Ruchira Kamboj: CAA, राम मंदीरावरून पाकिस्तानचा 'UN'मध्ये थटथयाट; भारताने मात्र फटकारले

१३ मार्च रोजी भाजपने लोकसभा निवडणूकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागा आहेत. भाजपने २० जागांसाठी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नितीन गडकरी यांनी सोशल मीडियावर पंतप्रधान मोदी आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांचे आभार मानले आहेत.

नागपुरातून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नितीन गडकरी नागपुरातील घरी दाखल झाले. त्यानंतर त्यांचं संपूर्ण कुटुबानं औक्षण केलं. नितीन गडकरी यांचा भाजपने जाहीर केलेल्या लोकसभा उमेदवारांच्या दुसऱ्या यादीत समावेश आहे. राज्यात लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर चांगलाचं वातावरण तापलं आहे.

आज निवडणूकीच्या तारखेची घोषणा होण्याची शक्यता आहे. निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्यापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी देशवासियांना एक पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी १० वर्षातील विकासकामांचा पाढा वाचत जनतेला नवी गॅरंटी दिली आहे. आज दुपारी ३ वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे. लोकसभा २०२४ निवडणूक तारीख आज जाहीर होणार  आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply