Maharashtra Politics : 'आम्ही सर्व प्रकाश आंबेडकरांच्या संपर्कात, एकत्र लढा देऊ: बाळासाहेब थोरात

Maharashtra Politics : राज्यातील महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीवरुन राजकारण चांगलेच तापल्याचे दिसत आहे. काल महाविकास आघाडीच्या बैठकीसाठी प्रकाश आंबेडकर यांना निमंत्रण पाठवण्यात आले होते. मात्र प्रकाश आंबेडकर यांनी हे निमंत्रण नाकारत नाना पटोलेंवर टीका केली होती. त्यामुळेच वंचित आणि महाविकास आघाडीच्या युतीत बिघाडा झाल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. यावर आता बाळासाहेब थोरात यांनी महत्वाचे स्पष्टिकरण दिले आहे.

काय म्हणाले बाळासाहेब थोरात?

"देशातील इंडिया आघाडी भक्कमच राहणार आहे. जागा वाटप हा मोठा विषय असतो. काहीही झालं तरी इंडिया आघाडी भक्कम राहील. नाना पटोले, अशोक चव्हाण आणि मी प्रकाश आंबेडकरांसोबत चर्चा करतो. नाना पटोले हे अध्यक्ष आहेत त्यांचा मान त्यांना द्यावाच लागतो " असे बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले.

तसेच 'वंचित सोबत आमचा सातत्याने संवाद सुरू आहे. आम्ही सर्व  प्रकाश आंबेडकरांच्या संपर्कात आहोत. देश आणि लोकशाहीसाठी आम्हाला वेगळं राहून चालणार नाही. लोकशाही मोडीत काढणाऱ्यांविरोधात एकत्र लढाई लढावी लागेल. सर्वजण एकत्र पणाने लढा देऊ," असेही बाळासाहेब थोरात यावेळी म्हणाले.

Mumbai Grant Road Fire : मुंबईच्या ग्रँट रोड परिसरात लाकडाच्या गोदामाला भीषण आग, एकाचा मृत्यू

इच्छाशक्ती असेल तर आरक्षण नक्की मिळेल

"मराठा समाजाच्या आरक्षणावर निर्णय व्हावा हीच अपेक्षा आहे. दुसऱ्याच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण द्यावं ही देखील आमची भूमिका आहे. सरकार काही ना काही मार्ग काढेल असा विश्वास आहे, असे बाळासाहेब थोरात यावेळी म्हणाले. तसेच जरांगेंच आंदोलन शांततेच्या मार्गाने सुरू आहे. केंद्रात आणि राज्यात भाजपचीच सत्ता आहे त्यामुळे इच्छाशक्ती असेल तर आरक्षण नक्की मिळेल, असा टोलाही बाळासाहेब थोरात यांनी लगावला. 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply