Maharashtra Politics : नोव्हेंबर गेला, जानेवारी पण हुकला; सुधीरभाऊ वाघनखं कुठपर्यंत पोहोचली? काँग्रेसचा सवाल

Maharashtra Politics : छत्रपती शिवाजी महाराजांची लंडनमध्ये असलेली वाघनखं भारतात जानेवारी महिन्यात येणार, अशी माहिती राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली होती. मात्र, वाघनखं भारतात येण्याची प्रक्रिया आता लांबणीवर पडली आहे. त्यामुळे शिवरायांची वाघनंख आता एप्रिल-मे मध्ये भारतात येणार असं सांगितलं जातंय. दरम्यान, यावरुन काँग्रेसने ट्वीट करत भाजपला खोचक सवाल केला आहे. 

नोव्हेंबर गेला, जानेवारी पण हुकला, सुधीरभाऊ वाघनखं कुठपर्यंत पोहोचली? असं खोचक ट्वीट विधानसभेचे विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे. वर्ष संपले, 2024 उजाडले.. आता जानेवारी पण हुकले! वाघनखं काही आली नाही... आता परत लंडनवारी करणार की पुढची तारीख देणार? असा सवालही वडेट्टीवार यांनी विचारला आहे.

Akhil Bhartiya Marathi Natya Sammelan : नाट्य संमेलनाच्या कार्यक्रमात शरद पवारांची उपस्थिती, मात्र उद्घाटन सोहळ्याला अजित पवारांची दांडी

थाटामाटात विमानतळावर ढोल वाजवून, सरकारी तिजोरीतून जाहिरातबाजी करत तुम्ही वाघनखं आणायला लंडन पर्यटनाला गेले. येताना मात्र रिकाम्या हाताने परत आले होते, असा टोलाही विजय वडेट्टीवर यांनी लगावला. ब्रिटनमधील वाघखनं तात्पुरती भारतात आणायची आणि छत्रपती शिवरायांचा नावाने मते मागायची हा भाजपचा नवीन फंडा होता, अशी टीकाही वडेट्टीवार यांनी केली.

दुर्देवाने भाजपच्या या इव्हेंटवर पाणी फेरलं असं म्हणायला हरकत नाही, पण असे उपद्रवी इव्हेंट करून या सरकारला काय मिळतं. केवळ आपली पापं झाकणं. अशा प्रकारचे इव्हेंट करणे हाच या सरकारचा धंदा आहे, असा माझा स्पष्ट आरोप असल्याचं वडेट्टीवार म्हणाले.

दरम्यान, विरोधी पक्षाकडे नेता नाही, त्यामुळे आम्हाला चिंता करायची गरज नाही, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं होतं. त्यांच्या या वक्तव्याचा वडेट्टीवार यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. नेता जन्मातून मोठा होत नाही, तो लहानातून मोठा होतो. मुख्यमंत्री सुद्धा कार्यकर्ता म्हणून जन्माला आले होते. विरोधीपक्षाकडे नेता नाही असं म्हणणं म्हणजे स्वत:चा अपमान करून घेणं आहे, असंही वडेट्टीवार म्हणाले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply