Maharashtra Politics : सर्वात मोठी बातमी! विधान परिषदेच्या 'त्या' १२ आमदारांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा

Maharashtra Politics : विधान परिषदेच्या 12 आमदारांच्या नियुक्ती प्रकरणावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. यादरम्यान विधान परिषदेच्या १२ आमदारांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला असून अर्जदारानं याचिका मागे घेतली, त्यामुळे राज्यपालांना आमदार नियुक्त करायचे असेल तर करू शकतात असा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे.

राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची नियुक्ती प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्यामुळे अद्यापपर्यंत आमदार नियुक्त करता आली नव्हती. ठाकरे सरकारने 12 आमदारांची यादी तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोशयारी यांना दिली होती, पण त्यांनी त्यावर कुठलाही निर्णय दिला नव्हता.

त्यांनतर शिंदे फडणवीस सरकार आल्याने त्यांनी नवी यादी दिली याविरोधात याचिकाकर्ते सुनील मोदी यांनी सर्वोच्च न्यायालयात याची दाखल करत ठाकरे यांनी दिलेली यादी कायम ठेवावी अशी मागणी केली होती. या प्रकरणावर आज CJI चंद्रचूड यांच्या समोर सुनावणी पार पडली.

Gadchiroli Ajit Pawar : कुणी काहीही म्हटलं तरी त्याला अर्थ नाही, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा

सप्टेंबर 2022 पासून राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नियुक्तींना कोर्टात स्थगिती देण्यात आलेली आहे. आता आज ही स्थगिती उठणार की कायम राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या आधी न्यायमूर्ती जोसेफ यांच्याकडे हे प्रकरण सुरू होते. पण ते निवृत्त झाल्यानंतर आता हे प्रकरण सरन्यायाधीशांसमोर सुनावणीसाठी आले.

राज्यातील सत्ता बदलानंतर याबाबत एक वेगळी याचिका दाखल करण्यात आली होती. राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून आधीची यादी परत पाठवली. हे कृत्य नियमात बसणारं नाही, असं सांगत न्यायालयात आक्षेप घेण्यात आला होता. त्यानंतर या निर्णयाला स्थगिती देण्यात आली होती.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply