Maharashtra Politics : मुंबईत ठाकरे गटाला खिडार, शिंदे गटाकडून उद्धव ठाकरेंना मोठा धक्का

Maharashtra : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींची लवकरच घोषणा होणार असल्याचे म्हटले जात आहे. या हिशोबाने राज्यात सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे दोन पक्ष आगामी निवडणुकीसाठी एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर असताना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.

ठाकरे गटाचा गड मानला जाणाऱ्या विक्रोळी विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला आहे. मोठ्या संख्येने ठाकरे गटातील पदाधिकारी, कार्यकर्ते हे शिंदेसेनेमध्ये सामील झाले आहेत. विक्रोळी विधानसभा प्रमुख अनिल पांगारे यांच्या वतीने हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

एकनाथ शिंदे यांच्या शिंदे गटातील नेते मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीमध्ये आज (८ ऑगस्ट) विक्रोळीमध्ये हा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. विधानसभा अध्यक्ष अनिल पांगारे यांच्या वतीने पक्षप्रवेश, विद्यार्थी गुणगौरव आणि रिक्षाचालकांना विमा वाटप देखील करण्यात आले. या पक्षप्रवेशामुळे मुंबईत शिंदे गटाने ठाकरे गटाला मोठा धक्का दिल्याचे म्हटले जात आहे.

'विक्रोळीतील पक्षप्रवेश ही मुंबई महानगरपालिका निवडणुकीची नांदी आहे. कोणी कितीही एकत्र येऊ द्या, महायुतीचा भगवाच फडकणार' असे वक्त्य मंत्री भरत गोगावले यांनी केले आहे. याशिवाय रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाबाबतची गोगावले यांनी माहिती दिली. आम्ही ठाकरे गटाला विक्रोळीत खिंडात पाडल्याचे वक्तव्य अनिल पांगारे यांनी केले.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *