Maharashtra Politics: "ही फूट नाही तर पक्षांतर्गत मतभेद"; शिंदे गटाच्या वकिलांचा आक्रमक युक्तीवाद

नवी दिल्ली : शिवसेनेत ४० आमदारांच्या बंडामुळं फूट पडली असून त्यांनी पक्षांतर केलं आहे. त्यामुळं त्यांच्यावर पक्षांतर बंदी कायद्यांतर्गत अपात्रतेची कारवाई व्हावी, असा मुद्दा उद्धव ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टात मांडण्यात आला. पण हे पक्षांतरच नाही, तर केवळ पक्षांतर्गत मतभेद असल्याचा युक्तीवाद शिंदे गटाचे वकील अॅड. नीरज किशन कौल यांनी केला. 

शिंदे गटाचे वकील अॅड. कौल यांनी पक्षांतर्गत लोकशाहीचा मुद्दा मांडला. ते म्हणाले, एका पक्षातून दुसऱ्या पक्षात आमचे आमदार गेलेले नाहीत. तर पक्ष नेतृत्वाचे विचार नाकारण्याचा अधिकार त्यांना आहे. पक्ष नेतृत्वानं घेतलेल्या नेतृत्वाशी पक्षाचे आमदार असहमत असू शकतात, म्हणजे ते पक्ष सोडून जातात असं नाही. तर पक्षातीलच एका नेत्याला त्यांना आपला नेता म्हणून निवडलं आहे. त्यामुळं ही फूट नाही तर पक्षांतर्गत मतभेद आहेत आणि मतभेद व्यक्त करणं म्हणजे पक्षांतर नाही, असा दावा यावेळी अॅड. कौल यांनी केला.

शिंदे गटाचे आमदार हे अद्यापही पक्षातच आहेत ते पक्ष सोडून गेलेले नाहीत, अशा शब्दांत त्यांनी कपिल सिब्बल यांचा युक्तीवाद खोडून काढण्याचा प्रयत्न केला. जेव्हा २१ जून रोजी शिवसेनेनं पक्षाची बैठक बोलावली तेव्हा आमदार गुवाहाटीला निघून गेले ते हजर राहिले नाहीत, असाही मुद्दा कपिल सिब्बल यांनी उपस्थित केला होता. पण या आमदारांना बैठकीचं पत्र देण्यात आलं नव्हतं, त्यामुळं हे सर्वजण शिंदे यांच्यासोबतच होते, असं अॅड. कौल यांनी युक्तीवाद करताना म्हटलं आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply