Maharashtra Politics : निवडणूक आयोगाच्या निर्णयावर स्टे-ऑर्डर येणार? ठाकरेंनी आखला मोठा प्लॅन, शिंदे गटही सतर्क!

Ekanath Shinde vs Uddhav Thackeray : केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी शिवसेना पक्षचिन्हाबाबत एक मोठा निर्णय दिला. आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटालाच दिलं. आयोगाच्या निर्णयामुळे शिंदे गटात आनंदाचं वातावरण असून ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर स्टे-ऑर्डर आणण्यासाठी एक मोठा प्लॅन आखला आहे

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर तातडीने स्टे-ऑर्डर आणण्यासाठी ठाकरे गट आज सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणार आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या गटाने देखील याबाबत सावध भूमिका घेतली असून ठाकरे गटाने याचिका दाखल करण्यापूर्वीच त्यांनी कोर्टात ‘कॅव्हेट’ दाखल केले आहेत.

ठाकरे गटाने निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान दिल्यास एकतर्फी सुनावणी घेऊन आदेश न देता आमचीही बाजूही ऐकून घ्यावी, अशी विनंती शिंदे गटाच्या वतीने या ‘कॅव्हेट’द्वारे करण्यात केली आहे.

मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह १६ आमदारांच्या अपात्रतेसह अन्य आठ महत्त्वाच्या मुद्द्यांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. मंगळवारपासून पुन्हा नियमित सुनावणी होणार आहे. त्यापूर्वीच निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह याबाबत शिंदे गटाच्या बाजूने निकाल दिला. उद्धव ठाकरे यांनी त्याविरुद्ध आपण सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे सांगितले.

ठाकरे यांच्या गटाकडून निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात आज सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली जाणार आहे. यामुळेच शिंदे गटातर्फे शनिवारी रात्रीच ‘कॅव्हेट’ दाखल करण्यात आला आहे. आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका ठाकरे गटाने दाखल केली, तर त्यावर आमची बाजू ऐकून न घेता सुनावणी घेऊन कोणताही आदेश जारी करू नये, असे यात म्हटले आहे.

"...तर निवडणूक आयोगाच्या निर्णयावर स्टे-ऑर्डर येणार"

दरम्यान, निवडणूक आयोगाने हा निर्णय सुप्रीम कोर्टाचा निकाल लागायच्या आधी द्यायला नको होता. सुप्रीम कोर्टात १६ आमदारांच्या अपात्रतेसह निकाल जर ठाकरे गटाच्या बाजूने लागला, तर गंभीर परिस्थिती निर्माण होईल. तेव्हा निवडणूक आयोगाने हा निर्णय सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या आधी वेळेमध्ये गंभीर चूक केलेली आहे, असं मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केलं आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply