Chandrapur Accident : वाजत-गाजत वरात निघाली; वाटेतच काळाचा घाला, ५० वऱ्हाड्यांसह बस थेट नाल्यात कोसळली

Chandrapur News: चंद्रपूर येथून अपघाताची एक मोठी बातमी समोर आली आहे. लग्नाला निघालेल्या बसचा मोठा अपघात झाला आहे. या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला असून ६ प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, बसमध्ये एकून ५० प्रवासी होते. राजुरा येथून विवाह झाल्यावर वरात वाजतगाजत नांदगावात येत होती. नवी नवरी घरी घेऊन येत असताना वाटेत काही विपरीत घडेल याची कोणालाच काही कल्पना नव्हती. लग्नामुळे सर्वच आनंदात होते. मात्र वाटेतच काळाने घाला घातला.

दरम्यान, किन्ही गावाजवळच्या वळणावर बसचा भीषण अपघात झाला. वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस थेट नाल्यात पलटी झाली. रात्री झालेल्या अपघातानंतर स्थानिकांनी जखमींना बाहेर काढून रुग्णालयात नेले. चंद्रपूर- बल्लारपूर- कोठारी - पोंभुर्णा पोलीस ठाण्याच्या पथकांनी घटनेची माहिती मिळताच येथे धाव घेतली.

या दुर्दैवी घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कुटुंबात हळहळ व्यक्त केली जात आहे. हा अपघात इतका भीषण होता की, बस नाल्यात कोसळताच काही प्रवाशी बसबाहेर फेकले गेले. यात ६ जण गंभीर जखमी आहेत. त्यांना वाचवण्यासाठी डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करत आहेत.

माणगाव म्हसळा मार्गावर मोर्बा घाटात आज सकाळी पर्यटकांच्या दोन कारची समोरासमोर धडक झाली. या अपघातामध्ये दोन्ही कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सात जण जखमी झाले आहेत. डोंगरोली गावच्या हद्दीत हा अपघात झाला असून मुंबईहून परत येणाऱ्या 108 रुग्णवाहीकेने मदतकार्य करत सर्व जखमींना माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply