Saṅgamanēr : मनसैनिकांचा हिवरगाव पावसा टोल नाक्यावर राडा, स्थानिकांच्या शुल्क माफीसाठी फलक फाडले

Saṅgamanēr : टाेल नाक्याच्या वसूली वरुन आज संगमनेर येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. मनैसनिकांनी संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा टोल नाक्यावर  राडा केला

संगमनेर तालुक्यातील नागरिकांना हिवरगाव पावसा टोल नाक्यावर स्थानिकांना टोल माफी द्यावी या मागणीसाठी आज मनसेने टाेल नाका येथे आंदाेलन छेडले. मनसैनिकांनी पक्षाचे झेंडे हातात घेऊन टाेल माफी मिळालीच पाहिजे अशी जाेरदार घाेषणाबाजी केली.

Pune Accident : पुण्यात भरधाव टँकरने तरुणाला उडवलं; अपघाताचा थरार CCTV कॅमेऱ्यात कैद

यावेळी मनसैनिकांनी टोल नाक्यावरील टोल सक्तीचे फलक फाडले. संगमनेर तालुक्यातील नागरिकांना टोल शुल्कमधून माफी द्यावी अशी मागणी मनसैनिकांनी टाेल व्यवस्थापनाकडे केली. मनसेच्या आजच्या आंदोलनामुळे हिवरगाव पावसा टोल नाक्यावर काहीकाळ गोंधळ निर्माण झाला.  

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *