Maharashtra Monsoon Session : राहुल गांधी यांच्या संसदेतील वक्तव्याचे महाराष्ट्रात पडसाद; विधानभवनात सत्ताधारी-विरोधक आमने सामने

Mumbai :  महाराष्ट्र विधीमंडळातील पावसाळी अधिवेशनाचा कालचा दिवस राहुल गांधी यांचं वक्तव्य आणि अंबदास दानवे-प्रसाद लाड यांच्यातील 'तू-तू-मै-मै'मुळे चांगलाच गाजला. या घटनेचे दुसऱ्या दिवशीही विधानभवनात तीव्र पडसाद उमटले आहेत. या विरोधात भाजप आमदारांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजप आमदारांनी विधानभवानाच्या पायऱ्यांवर राहुल गांधी आणि अंबादास दानवे यांच्या विरोधात आंदोलन करत घोषणाबाजी केली. हिंदूंचा अपमान सहन करणार नाही, अशा आशयाचे फलक झळकवत राहुल गांधी यांच्याविरोधात सत्ताधाऱ्यांनी आंदोलन सुरु केलं आहे.

राहुल गांधी यांच्या हिंदू धर्मावरील वक्तव्याचे महाराष्ट्र विधीमंडळातही पडसाद उमटले आहेत. महाराष्ट्र विधीमंडळात भाजप आमदारांनी राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. हिंदूंचा अपमान सहन करणार नाही, अशा आशयाचे बॅनर भाजप आमदारांनी झळकवले. तसेच भाजप आमदार प्रसाद लाड यांनी विधानपरिषदमध्ये विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी शिवीगाळ केल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.

Pune Metro Escalator Accident : धक्कादायक! मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून पडून प्रवाशाचा मृत्यू

भाजप आमदार प्रसाद लाड म्हणाले, 'अंबादास दानवे यांच्या विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा झाला पाहिजे. विरोधी पक्षनेत्याचं निलंबन झालं पाहिजे. त्यांनी माझी नाही, तर माझ्या आईची माफी मागितली पाहिजे. प्रत्येक गुन्हेगारांमध्ये अहंकार निर्माण झाला आहे. माझं मत आहे की, सरकारच्या निर्णयाशी सहमत राहील. पण राजीनामा मागितली पाहिजे. उद्धव ठाकरेंनी त्यांना जाब विचारला पाहिजे. त्यांना शिक्षा केली पाहिजे'.

'राहुल गांधी यांच्या निषेधासाठी सभागृहात राहिलो. त्यावेळी आमदार अंबादास दानवे यांनी मला शिवीगाळ केली. सभागृहात गैरवर्तन केलं. २५ वर्षांपूर्वी कर्करोगाने मृत्यू झालेल्या आईविषयी अपशब्द काढले. एका विरोधीपक्ष नेत्याला हे योग्य वाटतं का? बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नीला महाराष्ट्र मातोश्री म्हणायचा. त्यांचा पूत्र उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाता नेता अशा शब्दात शिवीगाळ करतो. त्यांनी त्यांना जाब विचारायला हवा. दानवेंनी माझ्या आई-बहिणीचा अपमान केला आहे, असे लाड पुढे म्हणाले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply