Maharashtra Monsoon Session : ज्येष्ठ नागरिकांना सरकार घडवणार देवदर्शन; CM शिंदेंकडून 'मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजने'ची घोषणा

Maharashtra Monsoon Session : राज्याच्या पावसाळी अधिवेशनामध्ये अंतरिम अर्थसंकल्प सादर झाला. अर्थमंत्री अजित पवार यांनी महिलावर्ग, शेतकरी, विद्यार्थी आणि युवकांसाठी अनेक मोठ्या योजनांच्या घोषणा केल्या. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही 'मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र योजने'ची घोषणा केली असून या योजनेमधून राज्य सरकार ज्येष्ठ नागरिकांना देवदर्शन घडवणार आहे.

मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची घोषणा!

राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थस्थळांचे दर्शन घडविण्यासाठी 'मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना' सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत केली. या योजनेसाठी धोरण आणि नियमावली तयार करून ज्येष्ठांना शासनाच्या माध्यमातून तीर्थस्थळांच्या दर्शनासाठी नेण्यात येईल,अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

Eknath Shinde : इतिहासात पहिल्यांदाच, प्रस्थान सोहळ्यासाठी खुद्द मुख्यमंत्री येणार आळंदीत

याबाबत शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी आमचे सरकार सर्वसामान्यांचे सरकार असून काल मांडण्यात आलेल्या अतिरिक्त अर्थसंकल्पामध्ये शेतकरी, कष्टकरी, वारकरी, कामगार, महिला, युवा यांच्यासाठी विविध तरतुदी केल्याचे सांगितले.

ज्येष्ठ नागरिकांन घडवणार देवदर्शन!

तसेच "महाराष्ट्र ही संतांची भूमी असून दरवर्षी अनेक जण तीर्थस्थळांना भेटी देतात. ज्येष्ठ नागरिकांना तीर्थस्थळांचे दर्शन सुलभपणे होण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी सर्वंकष धोरण तयार करून त्याची नियमावली केली जाईल. त्याअंतर्गत आवर्तन पद्धतीने, ऑनलाईन अर्ज मागवून ही योजना राबविण्यात येईल," असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply