Maharashtra Lok Sabha Election : नाशिकच्या जागेवरून माहायुतीत तिढा? हेमंत गोडसेंनी थेट प्रचाराचा नारळच फोडला

Maharashtra Lok Sabha Election : नाशिक लोकसभेच्या जागेवरून महायुतीत तिढा कायम आहे. विद्यमान खासदार असल्यामुळे शिवसेनेने या जागेवर दावा केला असताना सातारा लोकसभा मतदारसंघाच्या बदल्यात राष्ट्रवादीला नाशिकची जागा देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. दरम्यान हेमंत गोडसेंनी जोरदार शक्तीप्रदर्शन सुरू केलं आहे. उमेदवारी जाहीर झाली नसतानाही त्यांनी थेट प्रचाराचा नारळच फोडला आहे. त्यामुळे उमेदवारी मिळाली नाही तर ते अपक्ष निवडणूक लढवू शकतात असं बोललं जात आहे.

हेमंत गोडसे यांनी मात्र याचं चर्चांचं खंडन केलं असून १०० टेक्के उमेदवारी मिळणारचं असल्यांच म्हटलं आहे. नाशिक ची जागा शिवसेनेच्याच वाट्याला येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार प्रचाराला सुरुवात झाली आहे. इच्छुक उमेदवार म्हणून प्रचार करत आहे, केलेली कामे लोकांपर्यंत पोहचवत आहे. जर तरच्या गोष्टींना फारस काही महत्त्व नाही. मात्र जागा जर सुटली नाही तर पाहू, असंही हेमंत गोडसे म्हणाले आहेत. आजपासून शालिमार येथील मारुती मंदिरात प्रचार पत्रक वाढवून आरती करत प्रचाराला सुरुवात केली आहे.

Akola Crime News : अकाेला पाेलिसांचा गावठी दारु अड्ड्यावर छापा, दाेघांना अटक

नाशिक लोकसभेच्या जागेवरून महायुतीत सेना विरूद्ध राष्ट्रवादी अशी रस्सीखेच सुरू होती. मात्र ही जागा आता राष्ट्रवादीच्या पारड्यात पडणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. साताऱ्याची जागा भाजपाला दिल्यामुळे राष्ट्रवादीने त्याबद्दल नाशिकची जागा घेतल्याची चर्चा आहे. त्यामुळे नाशिकमधून छगन भुजबळ यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी या जागेसाठी जोरदार फिल्डींग लावली होती. या संदर्भात आज एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी आले होते. मात्र त्यांच्या पदरात निराशा पडण्याची शक्यता आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाचे विद्यमान खासदार असल्यामुळे हा मतदासंघावर शिवसेनेने दावा केला होता. शिंदे गटाने त्यांनी उमेदवारीही जाहीर केली होती. मात्र महायुतीच्या जागावाटपाबाबत चर्चा सुरू अशताना शिंदे गटाने हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर केल्यामुळे सध्या या मतदारसंघावरून भाजप आणि शिंदे गटात वातावरण चांगलंच तापलं होतं. त्यानंतर यांनी हेमंत गोडसे नाशिकहून शेकडो गाड्या घेऊन मुख्यमंत्र्यांच्या भेटीला मुंबईला जाऊन एकनाथ शिंदेंची भेट घेतली होती. मात्र ना शिवसेना ना भाजप ही जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाचा जाण्याची दाट शक्यता आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply