Maharashtra Lok Sabha Election : नाशिकमध्ये महाविकास आघाडीचे धक्कातंत्र; ठाकरे गटाचा वेगळाच प्लान?

Maharashtra Lok Sabha Election :  महायुतीकडून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची अद्याप अधिकृत घोषणा झाली नसली तरी, नाशिक लोकसभा मतदारसंघ शिवसेना (शिंदे गट) लढवणार असल्याचं स्पष्ट झाल्याचं मानलं जातंय. नाशिकमधून हेमंत गोडसे यांना उमेदवारी देणार असल्याचं जवळजवळ निश्चित आहे. त्यामुळं गोडसे यांच्यासमोर तगडं आव्हान निर्माण करण्यासाठी महाविकास आघाडी धक्कातंत्र अवलंबण्याच्या तयारीत असल्याचे समजतंय.

लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्यास काही तासच शिल्लक आहेत. महाराष्ट्रात भाजपनं जागावाटपात आघाडी घेतली असून, दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील २० उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. राज्यात भाजपसोबत महायुतीत असलेल्या शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून उमेदवारांची घोषणा झालेली नाही. हे जागावाटप आता अंतिम टप्प्यात आलं आहे. येत्या काही दिवसांत उमेदवारांची घोषणा अधिकृतपणे होण्याची शक्यता आहे.

Crime News : पतीनं पत्नीच्या हाताची नस कापली अन् पोटच्या लेकीच्या तोंडावर उशी दाबून संपवलं; दुहेरी हत्याकांडाने पुणे हादरलं !

राज्यात लोकसभेच्या अनेक मतदारसंघांबाबत पेच असला तरी, आपापल्या परीने राजकीय पक्षांनी तयारी केली आहे. नाशिक मतदारसंघ महायुतीत शिवसेनेच्या वाट्याला येणार असल्याचं निश्चित मानलं जात असून, शिवसेनेने हेमंत गोडसे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे. तर महाविकास आघाडीकडून ही जागा ठाकरे गटाच्या वाट्याला जाणार असल्याचं सागितलं जात असलं तरी, महाविकास आघाडीनं  धक्कातंत्र अवलंबण्याची तयारी सुरू केली आहे.

अदलाबदल की पक्षप्रवेशानंतर उमेदवारी?

नाशिक मतदारसंघात शिवसेनेकडून हेमंत गोडसे मैदानात उतरणार असल्यानं त्यांना तगडं आव्हान निर्माण करण्यासाठी महाविकास आघाडीनं डावपेच आखण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष गोकुळ पिंगळे यांना ठाकरे गटाकडून रिंगणात उतरवण्याबाबत चाचपणी केली जात असल्याचं सूत्रांकडून समजते.

पिंगळे हे इच्छुक उमेदवारांपैकी एक आहेत. त्यांना ठाकरे गटात प्रवेश देऊन निवडणूक आखाड्यात उतरवण्यासाठी चर्चा सुरू आहे. त्याबाबत शरद पवार आणि संजय राऊत यांच्यात चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. नाशिकची जागा ठाकरे गटाला सोडली असली तरी, बलाढ्य उमेदवार देण्यासाठी महाविकास आघाडीत खलबते सुरू असल्याची चर्चा आहे. दुसरीकडे मुंबईत आज बैठक होणार आहे. या बैठकीत नाशिकच्या उमेदवारीबाबत निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply